सुरक्षेला फाटा, उसळतील लाटा!

मनोज साखरे
Tuesday, 24 November 2020

मास्कविनाच खाद्यपदार्थांची देवाणघेवाण, कोरोनालाच देताहेत निमंत्रण 

औरंगाबाद : अत्यंत प्रतिकुल अशा कोरोना काळातून आपण जात आहोत. सर्वच यंत्रणा सतर्कता बाळगण्याचे वारंवार इशारा देत असताना आपण मात्र मास्कविनाच व्यवहार करीत आहोत. खाद्य पदार्थ निर्मितीपासून ते लोकांना देण्यापर्यंत कोणतीही सुरक्षा बाळगली जात नसून उघड्यावर पदार्थ ठेवून तेच ग्राहकांना वितरीत केले जात आहेत. कुणीच मास्क वापरत नसल्याने कोवीड काळातच सुरक्षेला फाटा बसत असून अशाने संसर्गाच्या लाटा पुन्हा उसळण्याचीही शक्यता आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
कोरोनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. अन्नावाचून अनेकांचे जीव गेले. आर्थिक संकटे आली. दैनंदिनी थांबली. नोकऱ्या गेल्या. याची झळ अजूनही सोसतोच आहे. अशा भीषण संकटापेक्षा आणखी कोणते संकट भयावह असेल परंतू यातूनही आपण बोध घेत नसल्याचे बऱ्याच माणसांच्या वर्तनावरुन दिसून येत आहे. मास्क घालणे, सुरक्षित अंतर राखून व्यवहार करणे व वेळोवेळी निर्जंतूकीकरण करणे या गोष्टींना आपण फाटा देत आहोत. ही धोक्याची घंटा ठरू शकते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सजग व्हा 

 • अगदी भेळ, रगडा व पाणीपुरीची गाडे असो की, नाश्‍ता-चहाचे ठेले, मेस असो की हॉटेल्स, रेस्टांरट यातील बहूतांश ठिकाणी सुरक्षेच्या उपायांना फाटा दिला जात आहे. अशा अनेक गंभीर बाबी ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीतून समोर आल्या. 
 • कामगार चौक ते वसंतराव नाईक चौक सिडकोदरम्यानच्या एका पावभाजी व भेळचा गाड्यावर गेलो, त्यावेळी विक्रेता मास्कविनाच भाजी तयार करीत होता व इतर ग्राहकांना देत होता. पाव देतानाही हातात ग्लोज घातलेले नव्हते अथवा वारंवार हातही धुतले नाहीत. 
 • आकाशवाणी परिसरात एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो असता, तेथे विनामास्क पदार्थ तयार केले जात होते. 
 • आर्डर घेणाऱ्यानेही मास्क परिधान केलेला नव्हता. उघड्यावर पदार्थ ठेवून विक्री होत असल्याचे दिसून आले. किमान खाद्यपदार्थासाठी सर्व सुरक्षाविषयक बाबींचा अवलंब करणे यथायोग्य राहील. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ही अमलबजावणी हवी 

 • महापालिका पथके, पोलिस व अन्न-औषधी प्रशासनाने यात लक्ष घालावे. 
 • मास्क न वापरणाऱ्याना दंड लावावा. 
 • खासकरुन अन्न पदार्थ तयार करणाऱ्यांना मास्क सक्तीचाच करावा. 
 • खाद्यपदार्थ, निर्माते, विक्रेत्यांना अन्न औषध प्रशासनाने मार्गदर्शन करावे. 
 • स्वतः पालन करुन ग्राहकांनीही विक्रेत्यांच्या लक्षात या बाबी आणुन द्यायला हव्या. 
 • विक्रेत्यांनी खाद्यपदार्थ उघड्यावर ठेऊ नये. उघड्यावरील पदार्थ खाणे ग्राहकांनीही टाळायला हवेत. 
 • खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी मास्क व निर्जंतूकीकरण करायलाच हवे, विक्री ठिकाणी स्वच्छताही ठेवावी. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona cracks Aurangabad district increasing threat corona