क्वारंटाइन सेंटरमध्येच पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार 

Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

औरंगाबाद : कोरोनाच्या संशयित नागरिकांना ठेवण्यासाठी सुरू केलेल्या चार क्वारंटाइन सेंटरमध्ये आता सौम्य लक्षणे आढळून आलेल्या १७८ पॉझिटिव्ह जणांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत, असे शहर अभियंता तथा क्षेत्रीय अधिकारी सखाराम पानझडे यांनी सांगितले. 

शहरात हॉटस्पॉट ठरलेल्या भागांची संख्या ४६ वर गेली आहे. या भागातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे टास्क फोर्सच्या माध्यमातून घरोघर जाऊन लाळेचे नमुने घेतले जात आहेत. या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर १५ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्ती पॉझिटिव्ह असतील तर त्यांना महापालिकेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.

याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. महापालिकेने शहरात दहा ठिकाणी क्वारंटाइन सेंटर सुरू केले आहेत. त्यांपैकी चार सेंटरमध्येच पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यात आले आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी याच ठिकाणी डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहेत. सौम्य लक्षणे असलेल्यांवर अशाप्रकारे उपचार केले जात असल्याचे पानझडे यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा


या ठिकाणी सुरू आहेत उपचार 
संत तुकाराम वसतिगृहात १०६, देवगिरी महाविद्यालय वसतिगृहात २५, रेल्वेस्टेशनजवळील एमटीडीसी वसतिगृहात सहा, तर पदमपुऱ्यातील अग्निशमन दलाच्या इमारतीमध्ये ४१ अशा १७८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कलाग्राम, एमजीएम, एमआयटी, मराठवाडा प्रबोधिनी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय वसतिगृह, सामाजिक न्याय विभागाचे पदमपुरा (मुलींचे) वसतिगृह या सहा ठिकाणी व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आलेले नाही, असे पानझडे यांनी सांगितले. 

फिटनेस प्रमाणपत्रासाठी सुरक्षित अंतराचा फज्जा 
सुरक्षित अंतर पाळण्यासाठी शासन-प्रशासनातर्फे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र आम्ही सुधारणार नाही, अशा आविर्भावात नागरिक किराणा दुकाने, भाजीपाला खरेदी व आता फिटनेस प्रमाणपत्रासाठी गर्दी करत आहेत. महापालिकेने नोंदणीकृत दवाखाने व सर्व सरकारी रुग्णालयांमधून फिटनेस प्रमाणपत्र देण्याची सोय केली आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये रांगा लागत आहेत. केवळ दोनच तास ही सेवा असल्यामुळे अनेकांना माघारी जाऊन दुसऱ्या दिवशी यावे लागत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी महापालिकेने सर्वच खासगी रुग्णालयांत प्रमाणपत्र दिले जातील, असे जाहीर केले आहे. मात्र महापालिका रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com