मिशन बिगेन अगेन : औरंगाबादेत काय सुरू, काय राहणार बंद...

Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

औरंगाबाद  ः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून हळूहळू शिथिलता दिली जात आहे. त्यासाठी ‘मिशन बिगेन अगेन’ सुरू करण्यात आले आहे. दरम्यान ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात मॉल, हॉटेल बंदच राहणार असून, दुचाकीवरून डबलसिट फिरण्यास तसेच कारमध्ये चालकासह चौघांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (ता. ३१) यासंदर्भात आदेश काढले आहेत. 

प्रशासकांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, मिशन बिगेन अगेन अंतर्गत नागरिकांना किरकोळ खरेदी, व्यायाम यासाठी नागरिकांना जवळच्या भागातच जाणे बंधनकारक असेल. यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेची सर्व ठिकाणे मात्र मॉल, व्यापारी संकुले, नाटयगृहे, प्रेक्षागृहे व फुटकोर्ट, उपाहारगृहे वगळून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू राहतील. पाच ऑगस्टपासून हा बदल होईल. परंतु मॉलमधील उपाहारगृहातील स्वयंपाकगृहांची घरपोच सेवा चालू राहील. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

दुचाकीवर दोघांनाही हेल्मेट सक्ती 
दुचाकीवरून डबलसीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र दोघांनाही हेल्मेट आणि मास्क बंधनकारक आहे. तीनचाकी वाहनात चालक व दोन प्रवासी, चारचाकीमधून चालक व तिघांना फिरण्याची परवानगी राहील. 

विवाह सोहळ्यासाठी ५० जणच 
संमेलने, परिषदांना प्रतिबंधित असतील. विवाह सोहळ्यासाठी ५० व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी राहील. तसेच अंत्यविधीसाठी २० पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी असणार नाही. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

असे आहेत आदेश 
लग्न समारंभासाठी खुली जागा, लॉन, वातानुकूलित नसलेले हॉल शासन आदेशानुसार निर्बंधासह चालू राहतील. 
मोकळया मैदानातील व्यायाम निर्बंधासह चालू राहील. 
वृत्तपत्राची छपाई व वितरण (घरपोच सेवेसह) चालू राहील. 
शैक्षणिक संस्थांची कार्यालये कर्मचारी (विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा) शिकवण्या व्यतिरिक्त अशैक्षणिक कामकाज चालू राहील. 
केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, सलून, स्पा दुकाने निर्बंधासह चालू राहतील. 
पाच ऑगस्टपासून योग्य ते सामाजिक अंतर व निर्जंतुकीकरणाच्या योग्य त्या उपाययोजना करून खुल्या मैदानात समूहाशिवाय खेळले जाणारे गोल्फ, नेमबाजी, जिमनॅस्टिक्स, टेनिस, खुल्या मैदानात खेळले जाणारे बॅडमिंटन व मल्लखांब या खेळांना परवानगी राहील. 
जलतरण तलावांना परवानगी नाही. 

कामाच्या ठिकणी घ्या काळजी... 
शक्य असेल तर होम फ्रॉम वर्कची अवलंब करावा. 
सार्वजनिक ठिकाणी वावरताना किमान सहा फुटाचे अंतर ठेवावे. 
थर्मल स्कॅनिंग, ऑक्सिमिटर, हात धुण्याची सुविधा उपलब्ध असावी. 
मानवी संपर्कात येणाऱ्या वस्तू, वारंवार निर्जंतूक कराव्यात. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com