esakal | Corona : विघ्नहर्त्याच्या उत्सवातील रोजगारावरच यंदा विघ्न! 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

उत्सवाच्या निमित्ताने फुलांचे हार, वाती, मोरपिसे घेऊन उभ्या राहणाऱ्या लाहन मुलांपासून ते डीजेवर गाणी वाजवणाऱ्यांपर्यंत अनेक समाजघटकांना रोजगार मिळतो. दरवर्षी गणेशोत्सवाच्या दोन-तीन महिने आधीपासूनच संबंधित लोक कामाला लागत असतात आणि दहा बारा दिवसात चांगले उत्पन्न मिळवतात. परंतू यावर्षी कोरोनाचे संकट आले आणि मार्चपासून जनजीवन ठप्प झाले आहे. याचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवावर जाणवणार

Corona : विघ्नहर्त्याच्या उत्सवातील रोजगारावरच यंदा विघ्न! 

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : गणेशोत्सव केवळ एक धार्मिक उत्सवच नव्हे, तर यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात गणेशमूर्ती विकणारे विक्रेते, खेड्यापाड्यांतून दुर्वा, आगरड्याची पाने, जास्वंदाची फुले विकायला घेऊन बसलेले लोक, गणेशमुर्ती घेऊन जाणारे हातगाडी, लोडींग रिक्षावाले, मंडपवाल्यांपासून रोजची आरती करणारे पुरोहित अशा हजारो लोकांना रोजगार मिळत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे सारे जागच्या जागीच ठप्प झाल्याने दरवर्षी हजारो लोकांना एकाचवेळी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या विघ्नहर्त्याच्या उत्सवात कोरोनाने या लोकांच्या रोजगारावरच विघ्न आणले आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
उत्सवाच्या निमित्ताने फुलांचे हार, वाती, मोरपिसे घेऊन उभ्या राहणाऱ्या लाहन मुलांपासून ते डीजेवर गाणी वाजवणाऱ्यांपर्यंत अनेक समाजघटकांना रोजगार मिळतो. दरवर्षी गणेशोत्सवाच्या दोन-तीन महिने आधीपासूनच संबंधित लोक कामाला लागत असतात आणि दहा बारा दिवसात चांगले उत्पन्न मिळवतात. परंतू यावर्षी कोरोनाचे संकट आले आणि मार्चपासून जनजीवन ठप्प झाले आहे. याचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवावर जाणवणार असून पर्यायाने या उत्सवतुन ज्यांना रोजगार मिळतो त्यांच्यावर फार मोठा प्रतिकुल परिणाम होणार आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

रोकडा हनुमान मंदिरात पौरोहित्य करणारे प्रवीण गुरूजी म्हणाले, की दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळात सकाळ-संध्याकाळ आरतीसाठी होत असते. यावर्षी ते प्रमाण फारच कमी होणार आहे. पर्यायाने दक्षिणा, शिधा मिळणार नाही. शहरात नोंदणीकृत सुमारे साडेचार हजार पुरोहितांना कोरोनामुळे यंदा शिधा आणि दक्षिणेपासून वंचित रहावे लागणार आहे.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

पैठण गेट येथील बॉम्बे ढोल सेंटरचे शेख रफिक म्हणाले, की दरवर्षी किमान ४०० ते ५०० ढोलची विक्री आणि दुरूस्ती करायचो. भजनीमंडळांसाठी तबले, मृंदंगाची कामे यायची मात्र यावर्षी व्यवसायच नाही. गणेशोत्सवाच्या तीन महिने आधी आम्ही कामाला सुरूवात करायचो मात्र यावर्षी निव्वळ बसून आहोत. कोरोनाच्या भितीने खेड्यातील लोकही येत नसल्याचे त्यांनी हताशपणे सांगितले. 

यांना मुकावे लागणार रोजगाराला 

  •  सजावटीचे सामान विकणारे 
  •  मखर, लाकडी पाट, चौरंग तयार करणारे आणि विकणारे 
  •  गुलाल, प्रसाद, धूप, आगरबत्ती, वाती तयार करून विरणारे 
  •  साऊंड सिस्टीमवाले 
  •  ढोल ताशे विक्रेते 
  •  सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे कलाकार 
  •  दररोज सकाळ संध्याकाळ आरती करणारा पुरोहितवर्ग 
  •  भंडाऱ्याचा प्रसाद करणारे आचारी, केटरर्स, त्यांचे मदतनीस
go to top