कांचनवाडीत कोरोना रुग्णांसाठी शंभर 'ऑक्सिजन बेड' 

माधव इतबारे
Friday, 25 September 2020

छत्रपती शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयाने घेतला पुढाकार. 

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने उपाय-योजनांमध्ये वाढ केली जात आहे. कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय (सीएसएमएस) येथील कोविड केअर सेंटरचे रूपांतर डेलीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये (डीसीएचसी) करण्यात आले आहे. त्यानुसार ऑक्सिजनचे शंभर बेड १० ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध होणार आहेत, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी शुक्रवारी (ता. २५) सांगितले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे महापालिकेने पाचही कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत काम सुरू केले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाच कोविड केअर सेंटरचे रूपांतर डीसीएचसीमध्ये होणार आहे. या ठिकाणी एक हजार बेड उपलब्ध होतील. तसेच कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयातील (सीएसएमएस) कोविड केअर सेंटरमध्ये शंभर ऑक्सिजन बेड सुरू करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सध्या ऑक्सिजनची लाईन टाकण्याचे काम सुरु असून, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, प्रशासक आस्तिककुमार पांडेय, सीएसएमएसचे रणजीत मुळे यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. याठिकाणी दाखल केल्या जाणाऱ्या कोरोना रुग्णांवर महापालिकेमार्फत उपचार केले जातील. ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यांना याठिकाणी दाखल केले जाईल, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.  

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

३६ डॉक्टर्स, परिचारिकांना प्रशिक्षण 
रुग्णांवर उपचार करण्यासाठी २० डॉक्टर्स व १६ परिचारिकांना घाटी रुग्णालयात सात दिवसाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणानंतर त्यांना सीएसएमएसच्या सेंटवर रूजू होतील, याठिकाणी महापालिकेचे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी देखील सोबतीला असतील, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient one hundred oxygen bed