सुखद वार्ता.. त्या कोरोना पॉझिटिव्ह मातेची नवजात मुलगी निगेटिव्ह

मनोज साखरे
Sunday, 19 April 2020

मुंबईतून औरंगाबाद शहरात आलेल्या पस्तीस वर्षीय गरोदर महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनीही मोठ्या प्रयत्नांनी तिचे सिझेरियन करून प्रसूती केली काल तिने एका गोंडस मुलीलाही जन्म दिला. पण ते बाळही कोरोनाग्रस्त असेल का, हा प्रश्न सर्वांना सतावत होता. 

औरंगाबाद : मुंबईतून औरंगाबाद शहरात आलेल्या पस्तीस वर्षीय गरोदर महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनीही मोठ्या प्रयत्नांनी तिचे सिझेरियन करून प्रसूती केली काल तिने एका गोंडस मुलीलाही जन्म दिला. पण ते बाळही कोरोनाग्रस्त असेल का, हा प्रश्न सर्वांना सतावत होता. 

त्या बाळाच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. ते निगेटिव्ह आल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. ही भारतातली दुसरी, तर जगातली पाचवी कोरोनाग्रस्त महिलेची प्रसूती होती. बाळाची शुश्रुशा डॉक्टर आणि परिचारिका करीत आहेत. तसेच बारा रुग्ण कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी 'सकाळ'ला दिली. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

कोरोनाची लागण झाल्यानंतर महिलेची प्रसूती करणे सोपे नव्हते. वैद्यकीय इतिहासातील ही पाचवी अनोखी प्रसूती ठरली. महिलेची प्रसूती शनिवारी (ता. 18) दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास करण्यात आली. महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले. बाळाचे वजन 3 किलो 200 ग्रॅम भरले. 

पॉझिटिव्ह आईच्या बाळाला कोवीड -19 ची लागण झालेली आहे की नाही हे तपासणीसाठी डॉक्टरांनी बाळाचे स्वाब, आईचा गर्भजलाचे व व्हजायनल स्वॅबचे एकूण तीन नमुने तपासणीसाठी घेत पाठविले. याचा अहवाला प्राप्त झाला असून, बाळ निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे डॉक्टरांनाही आनंद झाला असून या बाळाची काळजी डॉक्टर आणि इतर स्टाफ घेत आहे.

औरंगाबादेतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

त्या रुग्णांना आता फक्त एका अहवालाची प्रतीक्षा 

जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 12 रुग्णांची 14 दिवसानंतरची पहिली कोवीड -19 ची चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता चोवीस तासांच्या अंतराने घेतलेली दुसरी चाचणी निगेटिव्ह आली, की ते कोरोनामुक्त होणार आहेत. त्यानंतर त्यांना सुटी होईल, असेही डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Positive Woman Gave Birth To A Baby Girl Tests Negative In Aurangabad