कोरोना लसीकरणासाठी औरंगाबादेत ३७३ ठिकाणे 

माधव इतबारे
Sunday, 25 October 2020

महापालिकेचा कृती आराखडा शासनाला सादर 

औरंगाबाद : कोरोना विषाणूवरील लस अद्याप तयार झाली नसली तरी यासंदर्भातील संशोधन अंतिम टप्प्‍यात असल्याने शासनस्तरावरून लसीकरणाची तयारी अंतिम केली जात आहे. लस उपलब्ध होताच नागरिकांना ती देण्यासाठी कृती आराखडा तयार करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने अहवाल पाठविला असून, शहरात ३७३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! 

कोरोना विषाणू संसर्गाने जगभर थैमान घातले आहे. या संसर्गावर मात करण्यासाठी प्रतिबंधक लस तयार करण्याचे काम सुरू आहे. लस तयार झाली नसली तरी संशोधन अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. देशात दोन लसींवर संशोधन सुरू आहे. त्यामुळे लवकरच कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. म्हणून लसीकरणासंदर्भात तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारकडे आराखडा मागितलेला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाकडे आराखड्याची मागणी केली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे पत्र मिळतात औरंगाबाद महापालिका कामाला लागली होती व आराखडा तयार करून शासनाला सादर करण्यात आला. शासनाने शहरात किती ठिकाणी लसीकरण करता येईल? किती व्हॅक्सीनेटर उपलब्ध आहेत? त्यांची नावे अशी माहिती विचारली होती. त्यानुसार महापालिकेने सादर केलेल्या आराखड्यात शहरात ३७३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. लसीकरणासाठी महापालिकेकडे १२० व्हॅक्सीनेटर उपलब्ध आहेत. हे व्हॅक्सीनेटर वरील ठिकाणी रोटेशनप्रमाणे लसीकरण करतील, असे आराखड्यात स्पष्ट करण्यात आले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccination for 373 places Aurangabad news