esakal | कोरोनासुराच्या कचाट्यात आज औरंगाबादेतील ३३८ जण, दहा हजारांचा टप्पा ओलांडला
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

औरंगाबाद जिल्ह्यात आज २२५ जणांना सुटी झाली. यात शहरातील १५६ व ग्रामीण भागातील ६९ जण आहेत. आजपर्यंत ५ हजार ८६१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ३८५ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ३ हजार ८३६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

कोरोनासुराच्या कचाट्यात आज औरंगाबादेतील ३३८ जण, दहा हजारांचा टप्पा ओलांडला

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहेच. पण लॉकडाउनमध्ये टेस्टिंगही वाढत असल्याने रुग्णसंख्येत मोठा फुगवटा दिसत आहे. जिल्ह्यात आज (ता.१७) ३३८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील २४८ रुग्ण, ग्रामीण भागातील ९० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० हजार ८२ झाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात आज २२५ जणांना सुटी झाली. यात शहरातील १५६ व ग्रामीण भागातील ६९ जण आहेत. आजपर्यंत ५ हजार ८६१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ३८५ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ३ हजार ८३६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत १७४ पॉझिटिव्ह आले आहेत. यात सिटी एंट्री पॉइंटवरील ३५ आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाकडून झालेल्या चाचणीत ९१ तर  ग्रामीण भागात ४८ रुग्ण आढळलेले आहेत.

  • शहरातील बाधित रुग्ण        - २४८
  • ग्रामीण भागातील बाधित रुग्ण - ९०
  • यातही सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (३५)
  • तसेच मोबाईल स्वॅब कलेक्शन (टास्क फोर्स) (९१)


कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण -५८६१
उपचार घेणारे रुग्ण -३८३६
एकूण मृत्यू - ३८५

आतापर्यंत एकूण बाधित  - १००८२

औरंगाबादेत आणखी आठ जणांचा मृत्यू 

औरंगाबादेत कोरोना व इतर व्याधींनी आणखी आठ जणांचे मृत्यू झाले. यात दोन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३८१ जणांचे बळी गेले आहेत. 

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?  

छावणी येथील ६१ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात १५ जुलैला भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १६ जुलैला पॉझिटीव्ह आला. त्यांचा मृत्यू त्याच दिवशी रात्री पावने बाराच्या सुमारास झाला. त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेह होता. 

हनुमाननगर गल्ली क्रमांक दोन येथील ४५ वर्षीय कोरोनाबाधीत महिलेला पुंडलिकनगर येथील महापालिका आरोग्य केंद्रातून घाटी रुग्णालयात १५ जुलैला भरती करण्यात आले. त्यांचा १६ जुलैला रात्री पावने बाराच्या सुमारास झाला. त्यांना मधुमेह होता. 

संसारनगर येथील ६० वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात १५ जुलैला भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १६ जुलैला पॉझिटीव्ह आला. त्यांचा त्याच दिवशी सायंकाळी चारच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना शारीरीक व्याधीही होती. 

हेही वाचा- औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित कैदी पळाले, कोविड सेंटरमधून केला पोबारा  

आदीत्यनगर, गारखेडा येथील ५४ वर्षीय कोरोनाबाधीत पुरुषाला कोवीड केअर सेंटर एमजीएम येथून घाटी रुग्णालयात १६ जुलैला भरती केले. त्यांचा त्यांचा मृत्यू त्याच दिवशी रात्री पावने बाराच्या सुमारास झाला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १७ जुलैला पॉझिटीव्ह आला. त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेह होता. 

विविध खासगी रुग्णालयात मौलाना आझाद चौकातील ७३ वर्षीय पुरूष, फाजलपुऱ्यातील ७५ वर्षीय पुरूष, अजिंठा (जि. औरंगाबाद) येथील देशमुख गल्लीतील ७२ वर्षीय पुरूष, शाहिस्ता कॉलनीतील ७६ वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

हेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....

हेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार