esakal | धक्कादायक... औरंगाबादेत आणखी एक कोरोनाबाधिताचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या औरंगाबादेत दिवसेंदिवस वाढत आहे. या महिलेच्या मृत्यूमुळे औरंगाबादची सख्या वाढून आता सहावर गेली आहे. त्यामुळे औरंगाबादची चिंता वाढली आहे. 

धक्कादायक... औरंगाबादेत आणखी एक कोरोनाबाधिताचा मृत्यू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद ः  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवारी (ता.२५) दाखल करण्यात आलेल्या ६० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा सोमवारी (ता.२७) दुपारी साडेबारा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळवले आहे.

लेफ्ट साईडेड न्यूमोनायटिस विथ डायबेटिस विथ हायपरटेंशन विथ हायपोथायरॉडीझम या आजारामुळे किलेअर्क भागातील ६० वर्षीय महिलेला २४ एप्रिलरोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ एप्रिल रोजी या महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. तसेच त्याच दिवशी त्यांचा कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोनासोबतच मधुमेह, रक्तदाब आदी आजार असल्याने या वृद्धेची प्रकृती चिंताजनक बनली होती. 

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

त्यांचे मृत्यूचे कारण बायलॅटरल न्युमोनाटीस विथ ऍक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोम ड्यू टू कोविड १९ इन केस ऑफ डायबेटिस मलायटस टाइप टू विथ डायबेटिक नेफ्रोपॅथी, हायपरटेंशन, इस्चेमिक हार्ट डिसिज विथ हायपोथयरॉडिझम असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. प्रसिद्धी पत्रकावर घाटीच्या अधिष्ठाता डॉ.येळीकर यांच्यासह माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांच्या स्वाक्षरी आहेत.

शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके वाचा

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या औरंगाबादेत दिवसेंदिवस वाढत आहे. या महिलेच्या मृत्यूमुळे औरंगाबादची सख्या वाढून आता सहावर गेली आहे. त्यामुळे औरंगाबादची चिंता वाढली आहे. बाहेरुन आलेल्या कोरोनाग्रस्तांमुळे औरंगाबादेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर आरोग्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...


आतापर्यंत कोरोनाचे सहा बळी  
- ५ एप्रिल सातारा परिसरातील ५८ वर्षीय बँक  व्यवस्थापकाचा मृत्यू 
- १४ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू. 
- १८ एप्रिलला बिस्मिला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू 
- २१ एप्रिलला भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू. 
- २२ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू. 
- २७  एप्रिलला कीले अर्क येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू 

Coronavirus Aurangabad Live Updates - Due to this the number of corona patients is increasing in Aurangabad