File Photo
File Photo

औरंगाबादेत कोरोनाचे तीन बळी, एकुण ७२ मृत्यू 

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असुन बळींनी सत्तरी ओलांडली. शहरात कोरोना व ईतर आजाराने आणखी तीन बळी गेले असून एकुण मृत्युसंख्या ७२ झाली. यात आतापर्यंत घाटीत ६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तर; खासगी रुग्णालयात १० व जिल्हा रुग्णालयात एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. 

आज (ता. ३१) सकाळी ४५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून एकूण बाधितांची संख्या १ हजार ५४३ झाली. यापैकी एक हजार २९ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आता ४४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

७० वा मृत्यू - 
औरंगाबाद शहरातील निझामगंज कॉलनी येथील ५२ वर्षीय महिला रुग्णाचा ३० मे रोजी सायंकाळी पाच वाजुन वीस मिनिटांनी उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मृत्यू झाला. 

७१ वा मृत्यू - 
किराडपुरा येथील ६२ वर्षीय महिलेला घाटीत ३० मे रोजी भरती करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल आज (ता. ३१) पॉझिटीव्ह आला व त्यांचा पहाटे सव्वाबाराच्या सुमारास मृत्यू झाला. बायलॅटरल न्युमोनिया विथ एक्युट रेस्पायरेटरी डिसट्रेस सिंन्ड्रोम ड्यूटू कोवीड-१९ इन केस डायबेटीज ॲन्ड हायपरटेन्शनमुळे त्यांचा मृत्यू झाला. 

७२ वा मृत्यू - 
जुना बाजार येथील ७५ वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात ३० मे रोजी भरती करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल आज (ता. ३१) पॉझिटीव्ह आला व त्यांचा दूपारी साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. बायलॅटरल न्युमोनिया विथ एक्युट रेस्पायरेटरी डिसट्रेस सिंन्ड्रोम ड्यूटू कोवीड-१९ नोन केस ऑफ डायबेटीज मेलीटीस विथ हायपरलिपीडीमियामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

आज आढळलेले रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) - 
भवानी नगर, जुना मोंढा (४), कैलास नगर, गल्ली क्रमांक दोन (३), एन सहा, सिडको (३), जाफर गेट, जुना मोंढा (१), गल्ली क्रमांक17, संजय नगर, मुकुंदवाडी (१), गल्ली क्रमांक चार, रहीम नगर, जसवंतपुरा (१), व्यंकटेश नगर, जालना रोड (१), समता नगर (१), नवीन बायजीपुरा (१), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (१), किराडपुरा (३), पिसादेवी रोड (१), बजाज नगर (१), देवळाई परिसर (१), नाथ नगर (१), बालाजी नगर (१), हमालवाडी (१), जुना बाजार (२), भोईवाडा (१), मनजित नगर, आकाशवाणी परिसर (२), सुराणा नगर (१), आझम कॉलनी (१), सादात नगर (१), महेमुदपुरा, हडको (१), निझामगंज कॉलनी (१), शहागंज (१), गल्ली क्रमांक 24, संजय नगर (१), बीड बायपास रोड (१), स्वप्न नगरी (१), चंपा चौक (१), शताब्दी नगर (१), अन्य (३) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २६ महिला आणि १९ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. 

आतापर्यंत १ हजार २९ जण झाले बरे 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) येथुन आज दोन, जिल्हा रुग्णालयातून १० रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. महापालिकेच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, जिल्हा रुग्णालय व घाटी येथून आतापर्यंत एकूण आतापर्यंत १ हजार २९ जण झाले बरे होऊन घरी परतलेले आहेत. 

कोरोना मीटर 
बरे झालेले रुग्ण - १०२९ 
एकूण मृत्यू - ७२ 
उपचार सुरु असलेले रुग्ण - ४४२ 

एकूण रुग्णसंख्या - १५४३ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com