Coronavirus updates औरंगाबादेत आज 91 रुग्णांची वाढ, 1284 रुग्णांवर उपचार

मनोज साखरे
Friday, 19 June 2020

आज सकाळी  91 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 207 झाली आहे. यापैकी 1753 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 170 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे

 औरंगाबाद :  औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून दरदिवशी शंभर रुग्ण बाधित होत आहेत. शुक्रवारी (ता. 19) सकाळच्या सत्रात 91 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. आता एकूण 1 हजार 284 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

आज सकाळी  91 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 207 झाली आहे. यापैकी 1753 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 170 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

 

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

आज आढळलेले 91 रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) - राजन नगर (1), बायजीपुरा (1), रहीम नगर (1), युनुस कॉलनी (1), हनुमान चौक चिकलठाणा (1), राम नगर (1), बजाज नगर (2), रशीदपुरा (1), नारळीबाग (2), क्रांती नगर (1), अंबिका नगर (1), पुंडलिक नगर (3), नागेश्वरवाडी (2), नक्षत्रवाडी (1), हर्सुल (2), एन- नऊ सिडको (2), एन- अकरा सिडको (2), मिल कॉर्नर (1),एन - पाच सिडको (1), एन- आठ सिडको (1), शिवाजी नगर (1), जाधववाडी (2), शंभू नगर (4),  चिकलठाणा (5), रामकृष्ण नगर (2), इटखेडा (2), विश्वभारती कॉलनी (2), बीड बायपास (1), न्यू हनुमान नगर (2),  जय हिंद नगर, पिसादेवी (1), भानुदास नगर (1), श्रीविहार कॉलनी, बीड बायपास (3), जाधववाडी (1), पळशी (1), आरीश कॉलनी (1), गौतम नगर, प्रगती कॉलनी (1),

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....

द्वारका नगर, हडको (1), समता नगर (1), शिवाजी नगर (2), लहू नगर (2), राम नगर (1), ब्रिजवाडी (1), शहानूरवाडी (4), मुजीब कॉलनी (5), रामेश्वर नगर (2), न्यू ‍विशाल नगर (1), मयूर नगर (1), बुढीलेन (1), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1),  सिडको महानगर (1), लोकमान्य चौक, बजाज नगर (2), सुयोग हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (4), साऊथ  सिटी, सिडको महानगर (1), शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), शिवालय चौक, बजाज नगर (1), सारा गौरव, बजाज नगर (1)  या भागातील  कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 35 स्त्री व 56 पुरूष आहेत. 

कोरोना मीटर -
बरे झालेले रुग्ण - 1753
उपचार घेणारे रुग्ण - 1284
आतापर्यंत मृत्यू     - 170
---
आतापर्यंतचे एकूण बाधित - 3207

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus updates 91 positive in Aurangabad on Friday