म्हणून... आरटीई प्रवेश प्रक्रियेला तुर्तास स्थगिती...

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद : लॉकडाउनमुळे रखडलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना लॉटरीद्वारे प्रवेश मिळाला आहे, त्यांनी शाळेच्या सूचनेनुसार प्रत्यक्ष प्रवेश घ्यावेत, अशा सूचनाही प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत. तथापी, जेथे कोरोनाचे रुग्ण आढळले त्या ठिकाणी तूर्तास ही प्रक्रिया होणार नाही. परंतू, ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याची परवानगी शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.


लॉकडाउनमुळे स्थगित झालेली आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यास मान्यता मिळाली असली तरी औरंगाबाद महापालिका हद्दीतील १५६ शाळेतील आरटीई प्रवेशाबाबत मनपा आयुक्त निर्णय घेणार आहेत. तर ग्रामीण भागात आरटीई प्रवेश निश्‍चित झालेल्या शाळांना कार्यपद्धतीबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

या आहेत सूचना 
- जिल्ह्यातील दौलताबाद, पंढरपूर, वाळूज, तुर्काबाद, फुलंब्री, बाबरा, सिल्लोड, निल्लोड या केंद्रीय प्राथमिक शाळाअंतर्गत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत या केंद्राअंतर्गत आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार नाही. 
- ज्या गावांत, अथवा परिसरात कोरोना रुग्ण आढळले आहे, अशा गाव, परिसरातील शाळेत आरटीई प्रवेश प्रक्रिया तूर्तास होणार नाही. 
- कोविड १९ क्षेत्र असलेली गावे कोरोनामुक्त झाल्यानंतर संबंधित तहसीलदारांच्या अनुमतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. 

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....
-- 
पालकांसाठी सूचना 
पालकांनी शाळेत गर्दी करू नये, पालकांना प्रवेश प्रक्रियेबाबत निवेदन करायचे असल्यास तालुका पडताळणी समितीकडे संपर्क करावा. महानगरपालिका हद्दीतील शाळांसाठी शिक्षणाधिकारी मनपा व ग्रामीण भागातील शाळांसाठी त्या-त्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयास संपर्क साधावा. प्रवेश मिळालेली शाळा बदलून घेणे किंवा आरटीई कोट्यात प्रवेश करणे या दोन्ही प्रकारच्या तरतुदीसाठी कार्यालयास संपर्क करू नये. प्रतीक्षा यादीतील पालकांनी प्रवेश करण्यासाठी शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे संपर्क अथवा पाठपुरावा करू नये. 


शाळेने करावयाची कार्यवाही 

  • - गर्दी होणार नाही अशा प्रकारे प्रवेशाचे नियोजन करावे 
  • - प्रवेशाचे वेळापत्रक शाळेच्या गेटवर लावावेत 
  • - पालकांकडून कागदपत्र खरी असल्याची हमीपत्र भरून घ्यावे 
  • - दिलेल्या तारखेला पालक आले नाही तर पुढची तारीख द्या 
  • - प्रतीक्षा यादीतील पालकांना तूर्तास बोलावू नये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com