कोरोनामुळे गणेशमूर्तींची यंदा ऑनलाइन विक्री

 Covid Effect Now Ganesh Murty Also Available For Online
Covid Effect Now Ganesh Murty Also Available For Online

औरंगाबाद : गणेशोत्सव आला की सजावटीपासून गणेशमूर्ती खरेदीपर्यंतची लगबग सुरू होते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेश उत्सवावरही परिणाम जाणवणार आहे. दरवर्षी थेट खरेदी होणाऱ्या गणेशमूर्ती यंदा ऑनलाइन पद्धतीने विक्री करण्यावर विक्रेत्यांचा भर आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा ६० ते ७० टक्के मूर्ती निर्मिती व विक्रीवर परिणाम झाला असल्याचे मूर्तिकारांनी शुक्रवारी(ता.१४) सांगितले. 

गणेशोत्सवाच्या आठ दिवसांपूर्वी बाजारपेठेत बाप्पाच्या आगमनासाठी सजावटीचे साहित्य, मूर्ती विक्रेत्यांची लगबग सुरू होते. यंदा हे प्रमाण पूर्वीप्रमाणे नाही. अनेकजण सण उत्सवात होणाऱ्या खर्चाच्या प्रमाणावर कात्री लावत आहेत. 
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बाजारपेठा बंद होत्या. यामुळे व्यापारी आस्थापनांचेही मोठे नुकसान या काळात झाले आहे. चिनी वस्तूची आयात बंदचा झाल्याचा परिणाम सध्या जाणवत आहे.

 गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या डेकोरेशनसह लायटिंग सजावटीच्या किमती कमी होत्या. आता भारतीय बनावटीचे लायटिंग तसेच सजावट साहित्यही बाजारात विक्रीसाठी येत आहे. मात्र याच्या किमती वाढलेल्या आहेत. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या मूर्तीची निर्मिती कमी करण्यात आली असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. 

यंदा शाडूमातीच्या गणपतीपेक्षा पीओपीच्या मूर्तींना मागणी आहे. कारण शाडूमातीच्या मूर्तीपेक्षा पीओपीचे मूर्तीत किमतीत बराच फरक आहे व या संकटाच्या काळात प्रत्येकजण बचतीला महत्त्व देत आहे. त्यामुळे कमी किमतीच्या मूर्ती घेण्यास पसंती देत असल्याचेही मूर्तिकार सतीश छत्रे यांनी सांगितले. 

  • शहरात ५० ते ६० मूर्ती तयार करणारे कारखाने आहेत. 
  • प्रत्येक कारखान्यात चार ते पाच हजार मूर्तीची निर्मिती. 
  • यंदा केवळ ३० ते ४० टक्के मूर्तींची निर्मिती. 
  • बाहेरून येणाऱ्या ऑर्डर्सवर परिणाम. 
  • पाच ते दहा टक्‍क्‍यांनी मूर्तीच्या किमतीत वाढ. 
     

दरवर्षी दोन ते अडीच हजार मूर्ती तयार करत होतो. यंदा कोरोनामुळे ग्राहक येतील की नाही या भीतीमुळे ७०० मूर्त्या मी तयार केल्या आहेत. हैदराबाद, मुंबईला दरवर्षी हजार मूर्ती आम्ही पाठवतो. यंदा ऑर्डरच नाही. कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहक थेट खरेदीसाठी येण्याचे टाळत आहे. यामुळे आता ऑनलाइन पद्धतीने मूर्ती विक्री करत आहे. 
-सतीश छत्रे, मूर्तिकार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com