Good News : ई-यंत्र रोबोटिक्स स्पर्धेत औरंगाबादेतील हे महाविद्यालय देशात प्रथम 

अतुल पाटील
Saturday, 1 August 2020

आयआयटी पवई यांनी घेतलेल्या ई यंत्र रोबोटिक्स या राष्ट्रीय स्पर्धेत औरंगाबादच्या सीएसएमएसएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिरिंगच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेत देशभरातुन ३२१ नामांकित महाविद्यालयाच्या संघानी सहभाग नोंदविला, त्यातून २१ संघाची अंतिम फेरीकरिता निवड झाली होती.

औरंगाबाद : आयआयटी पवई यांनी घेतलेल्या ई यंत्र रोबोटिक्स या राष्ट्रीय स्पर्धेत औरंगाबादच्या छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या (सीएसएमएसएस) अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिरिंगच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्वस्त सौर ड्रायर हे उपकरण बनवले होते. त्यांना ३२ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

स्पर्धेत देशभरातुन ३२१ नामांकित महाविद्यालयाच्या संघानी सहभाग नोंदविला, त्यातून २१ संघाची अंतिम फेरीकरिता निवड झाली होती. या सर्व संघाच्या उपकरणांची चाचणी जानेवारी-२०२० मध्ये पुणे येथे घेण्यात आली. ऋषिकेश खोचे, शमा पठाण, जागृती राजहंस, शुभम काळे, या विद्यार्थ्यांनी विभाग प्रमुख प्रा. अभय मुदिराज, प्रा. मिथुन औष, प्रा. पल्लवी गुप्ता यांच्या मार्गदर्शनात स्वस्त सौर ड्रायर बनवले. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

विद्यार्थ्यांनी सांगितले कि, शेतकऱ्यांचे उत्पादन तयार झाल्यावर ते बाजारात उपलब्ध होऊन शेतकऱ्यांचा लाभ व्हावा, जेणेकरून शेतमालाचे नुकसान होणार नाही. तसेच शेती मालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत सदरील माल व्यवस्थित सुकवून साठवणूक करता आला पाहिजे. आणि योग्य भाव मिळाल्यावारच विकता आला पाहिजे. हा दृष्टिकोन समोर ठेऊन कृषीसाठी स्वस्त सौर ड्रायर हे उपकरण बनविले आहे. या उपकरणाच्या माध्यमाने शेतकऱ्यांनी पिकविलेला माल स्वस्त दरात सौर ऊर्जेच्या मदतीने वाळविण्याचे काम जलदगतीने होते तेही स्वस्त दरात शिवाय विजेच्या बचतीसह शक्य आहे. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

विद्यार्थी, प्राध्यापक यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, विभाग प्रमुख प्रा. अभय मुदिराज यांनी केले. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

अशी झाली स्पर्धा 
अंतिम फेरी ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यामध्ये पंचानी विद्यार्थ्यांशी संवाद साधला उपकरणाबाबतची माहिती घेतली, उपकरणाची गरज, फायदे-तोटे विषयी विचारणा करण्यात आली. प्रश्न-ऊत्तरे घेण्यात आली. यावेळी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. 

Edited By Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CSMSS first in E machine robotics competition in country