सलिमअली सरोवरात तरंगू लागले मृत मासे 

औरंगाबाद - सलिमअली सरोवरात तरंगणारे मृत मासे
औरंगाबाद - सलिमअली सरोवरात तरंगणारे मृत मासे

औरंगाबाद   : पक्षिमित्र सलिमअली यांच्या नावाने दिल्ली गेट परिसरातील ऐतिहासिक सलिमअली सरोवरात मोठाले मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. काही मेलेले मासे सरोवराच्या किनाऱ्यावर विखुरलेले दिसत आहेत. सरोवरातील पाणी प्रदुषित झाल्याने हे मासे मरत असल्याचे पर्यावरणतज्ञांकडून सांगण्यात आले. 

ऐतिहासिक दिल्ली गेट आणि हिमायतबागेच्या जवळ असलेला मोगलकालीन खिजर तलाव आज पक्षिमित्र सलीमअली यांच्या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जैव विविधता आहे, मात्र ही जैवविविधता आज धोक्यात आली आहे. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जलपर्णी काढून टाकण्यात आली. या ठिकाणी विविध पक्षी, किटक, वनस्पती आणि सरोवरात विविध प्रजातीचे मासे आहेत मात्र या माशांवर वाढत्या शहरीकरणामुळे गंडांतर आले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सरोवरालगतच महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात सांडपाणी जाण्याऐवजी थेट सरोवरात जाते याविषयी पर्यावरणप्रेमींनी अनेकदा आवाज उठवला आहे. या सरोवराचे पाणी सध्या हिरवेगार दिसत असून सरोवराच्या पृष्ठभागावर, किनाऱ्यावरील गवतामध्ये मेलेले मासे तरंगताना दिसत आहेत. 

यासंदर्भात पर्यावरणप्रेमी डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले, या सरोवराच्या तिन्ही बाजूंनी ड्रेनेजचे घाण पाणी सरोवरात येते त्यामुळे हे पाणी खूपच प्रदूषित झाले आहे. पाण्यात अल्गी ( शेवाळं ) वाढते त्याने पाण्याला हिरवा रंग आला आहे. पाण्यात अल्गी आणि फायटोप्लॅन्टम वाढल्याने पाण्यात फॉस्फरस आणि नायट्रोजनचे प्रमाण वाढल्याने मासे मरत आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जलपर्णी नैसर्गिकरित्या जलशुद्धीकरणाचे काम करत होत्या मात्र काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने त्या जलपर्णी काढून टाकल्या आहेत. सरोवरातील जैवविविधता वाचवण्यासाठी सरोवरात थेट प्रवाहित होणारे ड्रेनेजचे पाणी रोखणे हाच एकमेव उपाय आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे डॉ. पाठक यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com