चीनच्या रेझरला स्वदेशी पर्याय, बनवले 'डिस्पोजेबल रेझर'; औरंगाबादेतील तरुणांची निर्मिती  

Disbojeble lezer.jpg
Disbojeble lezer.jpg

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलूनमध्ये सुरक्षित सेव्हिंग करता यावी, यासाठी 'डिस्पोजेबल रेझर'चा अलीकडे वापर होतो. हे उत्पादन चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणावर आयात केले जाते. हेच उत्पादन देशातच तयार करावे, या उद्देशाने येथील युवा उद्योजक सागर कोकाटे, अनुप पंडित यांनी ‘मेक इन इंडिया'च्या माध्यमातून गुजरातमधील वापी येथे ‘क्लिअरएक्स इंडस्ट्रिज'च्या माध्यमातून नवीन स्टार्टअप सुरू केले. याद्वारे स्वदेशी बनावटीचे, दर्जेदार, कमी किमतीत ‘‘क्लिअरएक्स रेझर' तयार केले. आता ते देशभरात जात आहे. या दोघांनी चीनमधील रेझरला स्वदेशीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 

कोरोनामुळे सलूनमध्ये सेव्हिंग करताना सुरक्षितता महत्त्वाची असणार आहे. सेव्हिंगसाठी वापरली जाणारी पारंपरिक रेझरमुळे संसर्ग वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते. त्याशिवाय सलूनमध्ये वापरली जाणारी काही रेझर चीन बनावटीची आहेत. लॉकडाउनमुळे चीनमधून त्याची आयात बंद झाली. त्याला पर्याय उभा करण्याचा, काहीतरी वेगळे करण्याचा विचार सागर, अनुपने केला. ‘युज अँड थ्रो रेझरची संकल्पना पुढे नेण्याचे ठरविले. ही ती संकल्पना वास्तवात उतरावी, दर्जेदार आणि वाजवी असावी या उद्देशाने त्यांनी मार्चपासूनच अभ्यास सुरू केला. लागणारे यंत्रसामग्री, प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेचा शोध ते उत्पादन सुरू करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया लॉकडाउन काळातच पूर्ण केली. प्लॅस्टिक इंडस्ट्रिजचे हब समजल्या जाणाऱ्या वापीमध्ये हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या जूनपासून ‘क्लिअरएक्स बार्बर रेझर' हे उत्पादन सुरू केले. सध्या देशभरातील पन्नास हजारांहून अधिक सलूनमध्ये या रेझरचा वापर होत आहे. प्रतिरेझर मूल्य पाच ते सात रुपयांपर्यंत जाते. त्याची दहा रुपयांपर्यंत विक्री होत आहे. या प्रकल्पातून दिवसाकाठी वीस हजार रेझरचे उत्पादन होत आहे. त्यातून या दोघांनी ३५ ते ४० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

आणखी नव्या स्टार्टअपचा मानस 
यापूर्वी सागर, अनुप हे वॉटर इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते. या कामातून जमा झालेले पैसे आणि बँककडून कर्ज घेत त्यांनी हा प्रकल्प सुरू केला. दैनंदिन गरज असलेल्या सेव्हिंगसाठी सुरक्षित रेझर तयार तयार करून या दोघांनी चीनच्या उत्पादनाला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याशिवाय या क्षेत्रात भेडसावणाऱ्या समस्येची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात वॉटर, कॉस्मेटिक इंडस्ट्रिजमध्ये नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा मानस सागर कोकाटे, अनुप पंडित यांनी व्यक्त केला. 

डिस्पोजेबल स्वदेशी रेझरच्यानिर्मितीनंतर आता घरगुती, मेडिकलसाठी लागणारे रेझरविषयी संशोधन सुरू आहे. यातही स्वदेशी उत्पादन देण्याचा प्रयत्न असेल. -सागर कोकाटे, क्लिअरएक्स रेझर 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com