esakal | दिव्यांगांना मिळाली माणुसकीची साथ 
sakal

बोलून बातमी शोधा

divyang.jpg

चौथ्या दिवसांपर्यंत ११५ जणांना मिळाले कृत्रिम अवयव

दिव्यांगांना मिळाली माणुसकीची साथ 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : गुड इयर टायर कंपनी, सोसायटी फॉर वेलफेअर अॅन्ड एम्पॉवरमेंट न्यू दिल्ली व प्रेरणा ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित कृत्रिम अवयव वाटपाच्या चौथ्या दिवसांपर्यंत आज (ता.२९) पर्यंत ११५ जणांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
पहिल्या दिवशी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्‍घाटन केले. दिव्यांगांच्या पुनर्वसनाचे काम कौतुकास्पद असल्याचे गुप्ता म्हणाले. कमांडर अनिल सावे यांनी प्रास्ताविक केले. उपक्रमात सोसायटी फॉर ह्युमन वेल्फेअर अॅन्ड एम्पॉवरमेंटचे अध्यक्ष अरुणकुमार कुलश्रेष्ठ, श्री. संजीव, रजनी मोहन, यांच्यासह तांत्रिक टीम कृत्रिम हात पाय, कॅलिपर बसविण्याचे काम करीत आहेत. मराठवाड्यातील २०१ दिव्यांगांची तपासणी करून १६० जणांना साहित्य मोफत वाटपासाठी निवड करण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आज चौथ्या दिवशीही साहित्य वाटप झाले. यावेळी उपस्थित आमदार अतुल सावे यांनी उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच सहकार्याचेही त्यांनी आश्‍वासन दिले. कार्यक्रमास जिल्हा समाजकल्याण अधिकारी शिवराज केंद्रे यांनी शासनाच्या योजनांचा, उपलब्ध निधीचा वापर करून दिव्यांगासाठी प्रेरणा ट्रस्ट येथे नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले. संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सावे यांनी दिव्यांगासाठी तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करून कर्णबधिरांसाठी मोफत श्रवणयंत्र व वैद्यकीय शिबिर जाहीर केले. कार्यक्रमाला कार्यवाहक सचिव प्रेमराज पाटील, राजेंद्र राठोड, अथर्व गोंदावले आदींची उपस्थिती होती. सचिव अब्दुल हुसेन, कोषाध्यक्ष फारूक जमाल, ट्रस्टी डॉ. रवींद्र झंवर, डॉ. उज्ज्वला झंवर, मोईनोद्दीन रशीदोद्दीन, अभिषेक वाडकर तसेच कर्मचारी शिबिरासाठी कार्य करीत आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)