लग्नाच्या वरातीतून डीजेची वरात आरटीओ कार्यालयात

अनिल जमधडे
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद : डीजेच्या बांधणीसाठी मूळ वाहनाचा आकार बदलून अक्राळविक्राळ आणि हृदयाचे ठोके चुकविणारा डीजे तयार झाला; मात्र हाच डीजे नवरदेवाच्या वरातीतून आला थेट आरटीओ कार्यालयात. रस्त्यावर कर्णकर्कश आवाज करणाऱ्या या डीजेला आरटीओ निरीक्षकांनी जप्त केले.

परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. 14) आरटीओ कार्यालयातील भरारी पथकाने मॉडिफाय करणाऱ्या वाहनाविरुद्ध धडक मोहीम राबवली. यात मूळ बांधणीत बदल करणारी वाहने जप्त करण्यात आली आहेत. या जप्त वाहनात एका वरातीत धूम करून हृदयाचे ठोके चुकविणाऱ्या डीजेचाही समावेश आहे.

हेही वाचा  राज ठाकरे अडकले, आणि मग...   

सेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे यांनी काय केले  

धडक मोहिम

या धडक मोहिमेत प्रवासी बस, मालवाहतूक करणारी वाहने आणि एका डीजे वाहनाचा समावेश आहे. या सर्व वाहनमालकांनी आपल्या वाहनाच्या मूळ बांधणीत बदल करून त्या वाहनाची लांबी - रुंदी वाढवल्याचे आरटीओ पथकाच्या निदर्शनास आले. दरम्यान, ही सर्व वाहने आरटीओ कार्यालयात आणून जप्त करण्यात आली. ज्या वाहनमालकांनी आपल्या वाहनाच्या मूळ बांधणीत बदल केले आहेत, अशा वाहनमालकांना मेमो देण्यात आला आहे.

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी  

मूळ बांधणीत बदल

वाहनाच्या मूळ बांधणीत बदल करू नये असा कायदा आहे; मात्र तरीही वाहनाच्या मूळ बांधणीत बदल करून त्या वाहनाची लांबी-रुंदी वाढवणाऱ्या वाहनांना जप्त करण्यात आले. डीजेची वरात आरटीओत ईटखेडा येथील नवरदेवाचा विवाह पडेगाव येथे ठरलेला होता. लग्नासाठी नवरदेवाच्या मित्रांचा आनंद शिगेला पोहचला होता.

हे वाचलंत का?- आधीच नवरा, दोन मुले असताना दुसऱ्याशी लग्न : त्यानंच काढलं शोधून 

डीजेची वरात आरटीओ कार्यालयात

डीजेच्या तालावर बेदुंध होऊन डान्स सुरु असतानाच आरटीओच्या पथकाने कर्कश आवाजातील डीजेची वरात थेट आरटीओ कार्यालयापर्यंत नेली. जप्त केलेला डीजेच्या वाहनाचा मुळ आकार बदलण्यात आलेला होता. काचेच्या बंद बॉडीचा हा डीजे बेकायदेशीरपणे तयार करण्यात आलेला असल्याने आरटीओ पथकाने डीजे आरटीओ कार्यालयात नेला. कार्यालयात डीजे वाहनाचे मोजमाप करण्यात आले, त्यानंतर 40 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DJ Sound Vehicle Siezed By RTO Aurangabad News