कार बक्षीस लागल्याचे दिले आमिष, माजी सैनिकाला भामट्याने घातला सहा लाखांचा गंडा 

सुषेन जाधव
Thursday, 26 November 2020

स्नॅपडीलवरून ऑनलाईन खरेदी केल्यामुळे कार बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून भामट्याने माजी सैनिकाला पावणेसहा लाखांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला. बेगराज मनीराम सैनी (६५, रा. प्लॉट क्र. ८१०, सिडको वाळूज महानगर-१) असे फसवणूक झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. सैनी यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

औरंगाबाद : स्नॅपडीलवरून ऑनलाईन खरेदी केल्यामुळे कार बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून भामट्याने माजी सैनिकाला पावणेसहा लाखांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला. बेगराज मनीराम सैनी (६५, रा. प्लॉट क्र. ८१०, सिडको वाळूज महानगर-१) असे फसवणूक झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. सैनी यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
लकी ड्रॉ काढण्यात आला होता. त्यामध्ये तुमचा क्रमांक निघाला असून, तुम्हाला बक्षीस स्वरूपात कार लागली आहे. त्यासाठी टॅक्सच्या स्वरुपात रक्कम भरावी लागेल असे म्हणत माजी सैनिक सैनी यांच्याशी अलोककुमार सिंग या भामट्याने संपर्क साधला. तत्पूर्वी, सैनी यांनी सप्टेंबर २०२० मध्ये घरगूती वापरासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ऑनलाईन मागवली होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन मागविलेली वस्तू मिळताच २६ सप्टेंबर रोजी अलोककुमार या भामट्याने स्नॅपडीलचा प्रतिनिधी असल्याची थाप मारुन सैनी यांच्या व्हाटसअप क्रमांकावर स्वत:चे ओळखपत्र आदी कागदपत्रे पाठवली. त्यामुळे सैनी यांचा अलोककुमारवर विश्वास बसला. त्याने सैनी यांना ऑनलाईन खरेदीवर बक्षीस स्वरूपात कार लागल्याचे सांगत त्यांच्याकडून टॅक्स व इतर कारणे दाखवून फोन पे आधारे २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२० दरम्यान तब्बल पाच लाख ७० हजार ५०० रुपये उकळले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र, बक्षीसात लागलेली कार अद्यापही मिळत नसल्याचे पाहून सैनी यांनी अलोककुमारकडे दिलेल्या पैशांची मागणी केली. पैसे देण्यास अलोककुमार टाळाटाळ करु लागल्याने अखेर २४ नोव्हेंबर रोजी सैनी यांनी वाळुज एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex-soldier cheated Rs 6 lakh claiming car was prize