
पंकजा मुंडे अजिबात नाराज नाही, तुमच्याकडे बातम्या नसल्या की तुम्ही पंकजा मुंडे नाराज असल्याचा बातम्या चालवता. तुमच्याकडे बातम्या नसतील तर आम्ही पुरवू, पण पंकजा नाराज अशा बातम्या यापुढे चालवू नका, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजी चर्चेला पुर्णविराम दिला. औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीतच फडणवीस यांनी पंकजा मुंडेच्या नाराजी बद्दल स्पष्टीकरण दिले.
औरंगाबाद : पंकजा मुंडे अजिबात नाराज नाही, तुमच्याकडे बातम्या नसल्या की तुम्ही पंकजा मुंडे नाराज असल्याचा बातम्या चालवता. तुमच्याकडे बातम्या नसतील तर आम्ही पुरवू, पण पंकजा नाराज अशा बातम्या यापुढे चालवू नका, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजी चर्चेला पुर्णविराम दिला. औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीतच फडणवीस यांनी पंकजा मुंडेच्या नाराजी बद्दल स्पष्टीकरण दिले.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
भाजपच्या माजी मंत्री आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्याच बातम्या राजकारणात नव्या नाहीत. अगदी परळी विधानसभेतील पराभवापासून ते आताच्या मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील उमेदवारी पर्यंतच्या प्रवासात पंकजा मुंडे नाराज आहेत, अशा अनेक बातम्या प्रसिध्द झाल्या. पंकजा यांचे कट्टर समर्थक व भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केलेल्या बंडखोरीचा संबंध देखील पंकजा यांच्या नाराजीशी जोडला जातो. औरंगाबादेत पत्रकार परिषदेत फडणवीस यांना हा प्रश्न वारंवार विचारण्यात आला. यावर फडणवीस यांनी देखील मजेदार उत्तर देत या बातम्यांचे खापर प्रसारमाध्यामांवरच फोडले.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
फडणवीस म्हणाले, तुम्हाला बातम्या नसता तेव्हा तुम्ही पकंजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या चालविल्या जातात. बोराळकर हे गोपीनाथ मुंडे यांचे उमेदवार आहेत. गेल्यावेळी मुंडे साहेंबानीच त्यांना उमेदवारी दिली होती, पंकजा देखील त्याच्या साक्षीदार आहेत. त्यामुळे बोराळकरांना त्यांचा विरोध किंवा नाराजी कशी असेल? तुमच्याकडे बातम्या नसतील तर आम्हाला सांगा, आम्ही त्या सप्लाय करू, पण इथून पुढे पंकजा मुंडे नाराज,अशा बातम्या चालवू नका, असा चिमटा फडणवीस यांनी यावेळी काढला.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जयसिंगराव कायम अस्वस्थ असतात
भाजपचे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी देखील भाजपवर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या संदर्भात बोलतांना फडणवीस म्हणाले, जयसिंगराव आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते होते. ते आधी भाजपमध्ये होते, त्यांना अस्वस्थता जाणावयला लागले म्हणून राष्ट्रवादीत गेले, तिथे अस्वस्थ वाटायला लागले म्हणून पुन्हा भाजपमध्ये आले, आणि आता पुन्हा त्याच कारणाने राष्ट्रवादीत जातायेत. जिथे जातील तिथे त्यांना अस्वस्थ वाटते, असा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला.
(संपादन-प्रताप अवचार)