अवकाळी पावसानं भिजली, शेतकऱ्यानं रॉकेल टाकून जाळली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

दोन दिवसांपासून खराब झालेल्या वातावरणाने कपाशीसह रब्बीच्या पिकांवर संकट कोसळले आहे. बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्याचा जोर अधिक होता. त्यामुळे मोठे नुकसान झाले. 

सोयगाव : आधीच अवकाळी पावसाने ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात नुकसान झालेले कपाशीचे पीक पुन्हा मशागत करून सुस्थितीत आणण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहेत. अशावेळी गुरुवारी काही भागांत झालेल्या अवकाळी पावसाने कपाशी पिकांचे पुन्हा नुकसान झाले. त्यात कापूस ओला झाला. 

सोयगावसह तालुक्‍यात गुरुवारी (ता. 26) तुरळक भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात अंतिम टप्प्यात वेचणीला आलेली कपाशी भिजली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. 26) भिजलेले कपाशीचे पीक उखडून टाकत त्यावर रॉकेल ओतून ते जाळून टाकले.

याआधीचा ओला कापूस सुकवत त्याच्या वजनात घट झालेली असून, ओल्या कापसाला व्यापारीही कवडीमोल भावात खरेदी करीत असल्याने पुन्हा अंतिम टप्प्यातील वेचणीचा कापूस भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांनी भिजलेले कपाशीचे पीक उखडून त्यावर रॉकेल ओतून ते जाळले. पावसाने नुकसान झालेले असताना संबंधित विभागांकडून साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. 

हेही वाचा -  सहा महिन्याचं बाळ आईच्या कुशीत होतं.....पण काळही आला अन् वेळही आली...

दरम्यान, दोन दिवसांपासून खराब झालेल्या वातावरणाने कपाशीसह रब्बीच्या पिकांवर संकट कोसळले आहे. बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्याचा जोर अधिक होता. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून मात्र पावसात रब्बी पिकांपेक्षा कपाशी पिकांना मोठा फटका बसला असून कापूस भिजल्याने शेतकऱ्यांनी या भिजलेल्या कापसासह पिकांना आग लावली असून, गुरुवारी आगी लावल्याच्या घटना तालुक्‍यात उघडकीस आल्या आहेत.

उत्पन्नाचे सोडा; परंतु पुढील हंगाम सुकर

दरम्यान, अवकाळी पावसात भिजलेल्या कपाशी पिकांना आगी लावताना काही शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अवकाळी पावसासोबतच आठवडाभरापूर्वी या कपाशी पिकांवर बोंडअळींचा प्रादुर्भाव आढळून येत होता.

अरे बाप रे - Video : असा गेला सहा जणांचा जीव, एक दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात

नुकताच झालेल्या ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसातून दहा टक्के वाचविलेल्या कपाशी पिकांना बोंडअळींनी ग्रासले असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसात कापूस भिजला.

काय सांगता - युरोपची कंपनी करतेय थेट बांधावरून कारले खरेदी

हा भिजलेला कापूस वेचणी करताना येणाऱ्या अडचणी व त्याची खरेदी होताना होणारा त्रास यामुळे कपाशी पिकांना आग लावत असल्याचे शेतकरी प्रेमसिंग परदेशी यांनी सांगितले.

हेही वाचा - काय भयानक अनुभव आला या शिक्षिकेला वाचा...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Burning Cotton Crops in Soygaon Aurangabad