औरंगाबादेत कामगारांचे दीडशे दिवसांपासून उपोषण 

राजेभाऊ मोगल
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

औरंगाबाद : गेल्या दीडशे दिवसांपासून सुरू असलेल्या ऍटोकार्सच्या (व्हिडिओकॉन ग्रुप) कामगारांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी 
कामगारांनी गुरुवारी (ता.23) विभागीय आयुक्‍त कार्यालयावर मोर्चा काढला.

क्रांती चौकातून मोर्चाला सुरवात झाली. 17 महिन्यांपासूनचा कामगारांचा थकीत पगार द्या, या मागणीसाठी 340 कामगार दीडशे दिवसांपासून सहायक कामगार उपायुक्‍त कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत कामगारांनी मोर्चा काढला.

हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार   

याबाबत उपायुक्‍त शिवानंद टाकसाळे, मुख्यमंत्री सहायता कक्षातील नायब तहसीलदार पल्लवी लिगदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले, की याप्रकारणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे अभ्यास करून निर्णय घेतो, असे म्हणाले होते. त्यांचा अभ्यास झाला का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला. 

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन  

गरीब माणसांवर गुन्हे दाखल झाले, त्यांच्याकडून कुणाची फसवणुक झाली की तत्काळ अटक केली जाते. मात्र, धनदाडग्यांकडून खुलेआम फसवणुक सुरु असली तरी त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही, असे का, असा प्रश्‍न यावेळी ऍड. टाकसाळ यांनी विचारला. 

हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष  

या मोर्चात ऍड. अभय टाकसाळ, गजानन खंदारे, किरण राज पंडित, बाळू वाघमारे, शेख कय्युम शेख रज्जाक, सुनील सिरसाट, अप्पासाहेब वैद्य, मनोज पवार, सचिन जाधव, अशोक वाघ, हिरालाल राजपूत, साईनाथ ठेंगडे, बाळूभाऊ वाघमारे, निखिल खरात, कचरू गवळी, आनंद जाधव, संतोष गायकवाड, सोनू वाहूळ, भारत बनकर, चेतन दाभाडे, विठ्ठल चव्हाण, संजय सोनवणे, राजू भालेराव, गणेश खोसरे आदी सहभागी होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fasting for a day and a half in Aurangabad