esakal | तिच्या हातात येणार पोकलेनचेही स्टिअरिंग! 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

मोफत प्रशिक्षणासाठी सरसावली सपना शिवानी इन्फ्रास्ट्रक्चर 

तिच्या हातात येणार पोकलेनचेही स्टिअरिंग! 

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद ः रिक्षा, टॅक्सी अन् बसच नव्हे, तर विमान अन् रेल्वेचे स्टिअरिंगही महिला लीलया हाताळत आहेत. लष्करामध्येही अवजड वाहने सफाईदारपणे चालवतात; मात्र या सर्वांपेक्षा सहज हाताळता येणाऱ्या पोकलेन ऑपरेटर या क्षेत्रात अद्याप महिलांनी म्हणावा तसा प्रवेश केला नाही. त्यामुळेच महिलांनी या क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, यासाठी सपना शिवानी इन्फ्रास्ट्रक्चरने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. सामाजिक जाणिवेचा भाग म्हणून महिलांना पोकलेन शिकविण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. यातही त्या यशस्वी होऊ शकतील, असा विश्वास संचालक बाबासाहेब अवघड पाटील यांनी व्यक्त केला. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

समाधानकारक उत्पन्न 

आजघडीला चांगल्या ऑपरेटरला २० हजार रुपये प्रतिमहा पगार मिळतो. वर्षात केवळ आठ महिने काम असते, पावसाळ्याचे चार महिने बहुतेक मशीन बंद असतात. त्यातही खऱ्या अर्थाने सहा महिनेच काम चालते. पावसाळ्यात कामे बंद असल्याने पगार मिळत नाही; पण साधारणपणे आठ महिन्यांचा पगार मिळतो. महिला या क्षेत्रात आल्या तर कामाचे सहा ते आठ महिने गृहीत धरले तर अन्य वेळ महिलांना कुटुंबीयांना देता येऊ शकतो. विशेष म्हणजे पोकलेनची कामे साइटवर असतात; मात्र महिलांना आजूबाजूच्या गावात राहून किंवा दुचाकीने कामावर जाता येऊ शकते. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

यशस्वी वाटचाल शक्य 

पोकलेन ऑपरेटरशिवाय बँकांच्या किंवा कुटुंबीयांच्या मदतीने पोकलेन खरेदी करून थेट स्वतःच या व्यवसायात पदार्पण करता येणेही शक्य आहे. महिलांमध्ये अधिक चिकाटी असल्याने त्या यशस्वी वाटचाल करू शकतील. विशेष म्हणजे यासाठी परवाना काढण्याची गरज नसते. 

ऑपरेटर मिळणे अवघड 

राज्यात पोकलेन ऑपरेटर म्हणून स्थानिक पुरुष नगण्य आहेत. बहुतांश ८० टक्के ऑपरेटर तरुण हे बिहार, झारखंड आणि मध्यप्रदेशातील आहेत. त्यांना काम असो किंवा नसो पूर्णवेळ वेतन द्यावे लागते. कारण ते परप्रांतीय असल्याने घरी जाऊ शकत नाही. त्याचा परिणाम पोकलेन व्यावसायिकांवर होतो. एका पोकलेनचे दोन ऑपरेटर व एक हेल्पर यांच्या पगारासह खाणेपिणे आणि वैद्यकीय खर्च, मोबाईल यावर खर्च करावा लागतो. त्यामुळे स्थानिक महिला या क्षेत्रात आल्यास दोघांनाही लाभ होईल. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

कंपनीची सामाजिक बांधिलकी 

सपना शिवानी इन्फ्रास्ट्रक्चर या पोकलेनचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीने महिलांना पोकलेन ऑपरेटर प्रशिक्षण कशाप्रकारे देता येईल यावर विचार सुरू केला आहे. २०१० मध्ये यासाठी प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. विदेशात मोठ्या प्रमाणावर महिला ऑपरेटर आहेत. त्यामुळेच महिला या क्षेत्रात येतील, असा विश्वास कंपनीचे संचालक बाबासाहेब अवघड पाटील यांनी व्यक्त केला. 


पोकलेन ऑपरेटर म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये चार महिला काम करीत आहेत. महिलांना अन्य वाहने चालविण्याच्या तुलनेत पोकलेन ऑपरेट करणे खूप सोपे आहे. या क्षेत्रात महिलांना चांगली संधी आहे. 
- भारत बडोदे, पोकलेन अभियंता