Crime
Crime

भावी पोलिसाला रस्त्यात लुटले, सोनसाखळीसह १५ हजाराची रोकड हिसकावली

औरंगाबाद: हर्सुल पोलिस ठाण्यात कागदपत्रे देऊन परत घराकडे निघालेल्या भावी पोलिसाला तिघांनी रस्त्यात अडवून लुटल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार जळगाव रोडवरील नंदादीप हॉटेलजवळ गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला.

लुटारुंनी त्याच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी व १५ हजाराची रोकड हिसकावून पळ काढला. भागवत बद्रीनाथ ढाकणे (२८, रा. आडगाव बुद्रुक) असे या लुटमार झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

सध्या भागवात हा युवक पोलिस भरतीची तयारी करत आहे. १७ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास बहिण गिता ढाकणे हिला मिलकॉर्नर येथे भेटण्यासाठी गेला होता. तत्पुर्वी तो मित्र सोमीनाथ काकासाहेब तुपे याला भेटण्यासाठी टीव्ही सेंटर येथील त्याच्या ओमसाई हॉटेलवर गेला. तेथून सायंकाळी दुचाकीवर (एमएच-२०-सिव्ही-३४९२) तो मध्यवर्ती कारागृह येथे गेला. कारागृहातून कागदपत्रे घेतल्यानंतर हर्सुल पोलिस ठाण्यात गेला.

ठाण्यात कागदपत्रे दिल्यानंतर साडेसातच्या सुमारास नंदादिप हॉटेलपासून काही अंतरावर असताना तिघांनी तिला रस्त्यात अडवले. त्यापैकी एक जण म्हणाला की, मला तुझ्या गाडीवर बाळासाहेब यांच्या घरी सोड. तेव्हा भागवतने मी बाळासाहेब यांना ओळखत नाही, असे म्हणताच त्याच्या तोंडावरील रुमाल हिसकावून फाडला. पुढे त्याच्या तिन्ही साथीदारांनी त्याला दुचाकीवरुन खाली ओढून लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यापैकी एकाने कमरेच्या बेल्टने मारहाण करुन भागवतचा चष्मा फोडला.

त्यानंतर भागवतच्या गळ्यातील दोन तोळे चार ग्रॅमची सोनसाखळी आणि खिशातील पाकीट काढून त्यातील पंधरा हजार रुपये हिसकावले. हा प्रकार सुरू असताना रस्त्यावर गर्दी जमली. त्यावेळी लुटारुंपैकी एकाने गणेश भाऊ सोड, गणेश भाऊ सोड असे ओरडत होता. तसेच नंतर तो आपल्याला ओळखेल असे बोलू लागले. तेथे लोकांची बरीच गर्दी जमल्याने त्यांनी भागवतला सोडत पळ काढला. त्यावेळी लोकांनी त्यातील एक जण गणेश फुले असल्याचे सांगितले. याप्रकारानंतर भागवतने हर्सुल पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक पांडुरंग भागीले करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com