भंगाराच्या गोडाऊनला आग : तीस-पस्तीस हजारांचे साहित्य खाक 

Aurangabad news
Aurangabad news

वाळूज : परिसरातील भरवस्तीत असलेल्या भंगाराच्या गोदामाला मंगळवारी दुपारी आग लागून यंत्रसामग्रीसह प्लॅस्टिक व कचरा जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. 

वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव शेणपुंजी येथील गट क्रमांक 40 मधील गणेश नगरात अच्छेलाल यादव यांचे तीन हजार स्क्वेअर फुटांचे भंगारचे गोडाऊन आहे. हे गोडाऊन शालिकराम रामनरेश यादव यांनी पंधरा दिवसांपूर्वी भाड्याने घेतलेले आहे. या गोडाऊनला मंगळवारी (ता.28) रोजी दुपारी एकच्या सुमारास आग लागली.

या आगीत गोडाऊनमधील यंत्रसामग्री, मोटारी, प्लॅस्टिक व कचरा आदी 30 ते 35 हजारांचे साहित्य जळाल्याचे शालिकराम यादव यांनी सांगितले. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. वाळूज अग्निशमन दलाचे एस. एफ. वासनकर, व्ही. एस. खेडेकर, डी. एन. राठोड, एस. एस. अंभोरे यांच्या पथकाने एक बंब व तीन खासगी टॅंकरच्या मदतीने दोन तासांत आग आटोक्‍यात आणली.

भरवस्तीत विनापरवाना भंगाराचे गोडाऊन

वाळूज औद्योगिक वसाहतीत रांजणगाव शेणपुंजी येथे हे भंगाराचे गोडाऊन असून, चोहोबाजूने नागरी वस्ती आहे. विशेष म्हणजे, या गोडाऊनला ग्रामपंचायत, एमआयडीसी तसेच अग्निशमन दल यापैकी कोणाचीही परवानगी नाही. असे अनेक गोडाऊन या भागात विनापरवाना सुरू असल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

रस्त्याअभावी मिळवता आले नाही नियंत्रण

भंगाराचे गोडाऊन नागरी वसाहतीत आहे. शिवाय गोडाऊनकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचा बंब व पाण्याचे टॅंकर गोडाऊनपर्यंत पोचण्यास चालकाला मोठी कसरत करावी लागली. यामुळे आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com