esakal | औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांची प्रकृती स्थिर 
sakal

बोलून बातमी शोधा

माजी खासदार रामकृष्ण बाबा.jpg

रामकृष्ण बाबा यांना मधुमेहाचा त्रास असल्याने चार दिवसांपूर्वी त्रास होत होता. त्यामुळे औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे काकासाहेब पाटील यांनी सांगितले.

औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांची प्रकृती स्थिर 

sakal_logo
By
भानुदास धामणे

वैजापूर (औरंगाबाद) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे त्याचे पुत्र काकासाहेब पाटील यांनी शनिवारी (ता. २९) सांगितले.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
रामकृष्ण बाबा यांना मधुमेहाचा त्रास असल्याने चार दिवसांपूर्वी त्रास होत होता. त्यामुळे औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे काकासाहेब पाटील यांनी सांगितले. तालुक्यातील दहेगाव येथे १९७० साली सरपंच पदापासून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा करणाऱ्या रामकृष्ण बाबा यांच्या कारकिर्दीला खरा बहर आला तो १९८५ साली. यावर्षी त्यांनी वैजापूर तालुक्याचे आमदार पद भूषविले. हे पद १९९५ पर्यंत त्यांनी कायम ठेवले. याशिवाय १९९९ साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर खासदारकी मिळवली. रामकृष्ण बाबांनी पंचायत समितीचे सभापती भूषविले. २५ वर्ष जिल्हा बॅंकेचे चेअरमन म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट कॉप-आप बॅंकेचे पाच वर्ष संचालक म्हणूनही बाबांनी काम केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सध्या औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दहावी पास असलेल्या बाबांचे शेती विषयातील ज्ञान आणि मोठा अनुभव आहे. त्यामुळे १९९४ अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे जाऊन त्यांनी शेती तंत्रज्ञानातील बदल जाणून घेतले होते. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी थेट संपर्क साधणारे नेते म्हणून बाबांची ओळख आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Edit Pratap Awachar