कोरोनाबाधित क्षेत्रात कचराबंदी 

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधित वसाहतींची संख्या सुमारे एक हजारावर पोचली असून, अनेक भागांत महापालिकेने पत्रे लावून प्रवेशबंदी केली आहे. जीवनावश्‍यक वस्तू, औषधींचा पुरवठा प्रशासनातर्फे केला जात असला तरी या भागात कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. घंटागाडीच येत नसल्याने घरातील कचरा सडून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाबाधित वसाहतींमध्ये कचरा संकलन सुरूच असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. 

शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. रोज नवनवीन भागात रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाबाधित वसाहतींची संख्या सुमारे एक हजारापेक्षा जास्त झाली आहे. या भागात आरोग्यासह इतर उपाययोजना करताना महापालिकेच्या नाकीनऊ येत आहे. या भागातील कचरा संकलनाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सिडको एन-तीन, एन-चार भागात वारंवार रुग्ण आढळून आले तर काहींना महापालिकेने होम क्वारंटाइन केले आहे. त्यामुळे या भागातील कचरा घेण्यासाठी महापालिकेची घंटागाडी येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक दिवसांपासून घरात कचरा पडून असल्यामुळे तो सडून त्यात अळ्या होत आहेत. नाइलाजाने तो कुठेतरी मोकळा जागेत टाकला जाण्याची शक्यता आहे. 

लॉकडाउन तोडून आंदोलन करू... 
पडेगाव येथील प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असतानाही विरोध सुरूच आहे. कचरा प्रकल्पाचे काम बंद करावे; अन्यथा लॉकडाउन तोडून आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला आहे. कॉंग्रेसनेदेखील महापालिका प्रशासकांना निवेदन देऊन प्रकल्पाला विरोध केला आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 

कोरोनाबाधित वसाहतींसाठी वेगळी व्यवस्था करण्यासंदर्भात आम्हाला सूचना नाहीत. काही वसाहती बंद असल्या तरी अनेक वसाहतींमधील रुग्ण बरे झाल्यामुळे या वसाहती मोकळ्या झाल्या आहेत. सर्वच ठिकाणी घंटागाड्या जात आहेत. 
 नंदकिशोर भोंबे, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख. 


महापालिकेच्या म्हणण्यानुसार सफाई कर्मचारी कोरोनाबाधित वसाहतीतील कचरा उचलत असतील तर सफाई कामगारांच्या आरोग्याची कुठलीच काळजी घेतली जात नाही. कोरोनाबाधित भागातील कामगारांना संसर्ग होऊ नये म्हणून, पीपीई किट देणे गरजेचे आहे. 
राहुल इंगळे, शहर परिवर्तन आघाडी. 

 
आमच्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर गेल्या आठ दिवस कचरा घेण्यासाठी घंटागाडी आलीच नव्हती. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केल्यानंतर शुक्रवारी (ता. तीन) कचऱ्याची गाडी आली. 
अर्चना पाटणी, रहिवासी. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com