महिलांसाठी गेट गोईंगचे ऑनलाईन वर्कआऊट

अतुल पाटील
Friday, 10 April 2020

डॉ. संगीता देशपांडे यांच्या सकाळी सहा ते सात या वेळेत महिलांनी विविध व्यायाम प्रकारांचा आनंद घेतला. त्यानंतर सकस नाश्ता तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. नाश्ता तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पोषक तत्वानुसार विजेते ठरवण्यात आले. मंजू मंठाळकर, सोनम शर्मा, रंजना डिग्गीकर, सुवर्णा बाळापूरकर, नेहा कुलकर्णी यांनी पारितोषिक मिळवले.

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे अख्खं कुटुंबच घरात बंदिस्त आहे. दरम्यान, एव्हाना काही पुरुष मंडळीनी किचनचा ताबा घेतल्याचे तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेलच. मग महिला काय करतात? असाही प्रश्‍न अनेकांना पडला असेल. औरंगाबादेतील महिला मात्र, गेट गोईंगच्या माध्यमातून ‘वर्कआऊट’च्या नादाला लागल्या आहेत.

कोरोना व्हायरसमुळे देशभर लॉकडाऊन आहे. यामुळे गेट गोईंगतर्फे महिलांच्या तंदुरूस्तीसाठी दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमावर बंधने आली आहेत. यावर ऑनलाइन ‘वर्कआऊट’चा उपाय शोधत उपक्रमात खंड पडू दिलेला नाही. या उपक्रमात सुमारे शंभराहून अधिक महिला आपापल्या घरातून सहभाग नोंदवत आहेत. डॉ. संगीता देशपांडे त्यांना व्यायामाचे धडे देत आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या गेट गोइंगतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे दर महिन्यात एका रविवारी महिलांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी सदस्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात. लॉकडाऊनमुले या रविवारी सामूहिक उपक्रम घेणे शक्य नसल्याने ऑनलाइन उपक्रम राबविण्यात आला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

प्रकल्प प्रमुख आरती अग्रवाल, डॉ. भावना लोहिया, डॉ. सुजाता लाहोटी, डॉ. संगीता देशपांडे यांनी काम पाहिले. यासाठी गेट गोईंगच्या डॉ. उमा महाजन, डॉ. प्रिया देशमुख, डॉ. सुजाता लाहोटी,  डॉ. चारुशिला देशमुख,  नीना निकाळजे, दीपा डाबरी, डॉ. वंदना मिश्रा, निरुपमा नागोरी, दिप्ती खेमका यांनी पुढाकार घेतला.

सकस नाश्ता करण्याची स्पर्धा
डॉ. संगीता देशपांडे यांच्या सकाळी सहा ते सात या वेळेत महिलांनी विविध व्यायाम प्रकारांचा आनंद घेतला. त्यानंतर सकस नाश्ता तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. नाश्ता तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पोषक तत्वानुसार विजेते ठरवण्यात आले. मंजू मंठाळकर, सोनम शर्मा, रंजना डिग्गीकर, सुवर्णा बाळापूरकर, नेहा कुलकर्णी यांनी पारितोषिक मिळवले. परीक्षक म्हणून डॉ. संतोष तोतला, डॉ. नीती सोनी, डॉ. रेखा महाजन यांनी काम पाहिले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Get Going Online Workout For Women Aurangabad News