Lockdown पोसलेल्या बोकडांचे करायचे काय 

औरंगाबाद - जंभाळा येथील एम. ए. गोट फार्ममधील बोकूड
औरंगाबाद - जंभाळा येथील एम. ए. गोट फार्ममधील बोकूड

औरंगाबाद :  बकरी ईदला बकऱ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते. यासाठी चांगल्या वजनाच्या बोकडांना मोठी मागणी असल्याने शेळीपालन व्यावसायिकांनी व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करणाऱ्यांनी बोकडांचे उत्तम पोषण करून तयार केले. परंतु लॉकडाऊन आणि वाहतुक बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांनी बोकड खरेदीकडे पाठ फिरवली. यामुळे शेळीपालनाचा व्यवसाय निम्म्यावर आला आहे. यामुळे बकरी ईदला बोकड विकले गेले नाहीत तर त्यांना फुकट पोसत बसण्याची वेळ येणार आहे. तथापि काहींनी बोकड विक्रीसाठी सोशल मिडियाचा मार्ग निवडला आहे. 

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी छोट्या प्रमाणात शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. याशिवाय काहींनी अत्याधुनिक व्यवस्थापनासह शेळी पालन सुरू केले आहे. बकऱ्याचे मांस खाणाऱ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे या तयार बकरे घेण्यासाठी व्यापारी गोट फार्मवर पोचतात. दरवर्षी बकरी ईदसाठी खास बोकड पोसून तयार केले जातात. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे या व्यवसायावर खूप मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

बकरी ईदला होणाऱ्या बोकडांच्या विक्रीवर याचा परिणाम झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लहान मोठे मिळून किमान ३० गोट फार्म आहेत, याशिवाय शेळ्या पाळणारे लहान लहान शेतकरी वेगळेच. पाच पैकी एक शेतकरी खास बकरी ईदसाठी बकरे पोसतच असतो. परंतु व्यापारी गावात जात नाहीत, वाहतूक बंद आहे, कोरोनामुळे लोकांचे आर्थिक गणित बिघडले आहे या साऱ्याचा सर्वात जास्त फटका छोट्या शेतकऱ्यांना बसला आहे. 

व्हिडिओद्वारे बोकडांची माहिती 

जंभाळा येथील एम. ए. गोट फार्मचे अफसरभाई यांनी सांगितले, मार्चपासून लॉकडाऊनमुळे मटणाची दुकाने बंद होती , त्यामुळे बकऱ्यांची विक्री ठप्प होती. जरी एखाद्यांनी बोकडांची मागणी केली तरी वाहतूक बंद असल्यामुळे पुरवठा करता आला नाही. आताही बकरी ईदला मोठ्या प्रमाणात बोकडांची विक्री होते परंतु कोरोनामुळे व्यवसायावर चांगलाच विपरीत परिणाम झाला आहे. वाहतूक करण्यासाठी अडचणी येत आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्याशिवाय सद्या लोकांकडे पैसा नाही आणि ज्यांच्याकडे आहे ते पैसा जपून वापरत आहेत. यामुळे व्यवसाय ५० टक्क्यावर आलेला आहे. ज्यांना बोकड पाहिजे त्यांच्या फोनवर चार पाच बोकडांचे त्यांचे वजन व किंमत या सर्व माहितीचा व्हिडिओ त्यांच्या व्हाटसपवर पाठवून देतो. त्यांपैकी संबंधितांनी निवड करून कळवल्यानंतर व ऑनलाइन पेमेंट झाल्यावर ग्रहकांपर्येत बकरे पाठवून देतो. 

मागणी खूप पण होत नाही विक्री 

आडगाव सरक येथील निवृत्ती पठाडे या शेळीपालक शेतकऱ्यांने सांगितले, एका शेळीपासून मी सुरुवात केली आज शंभरावर शेळ्या आहेत. माझे पाहून गावातील इतर शेतकऱ्यंनीही शेळीपालन केले आहे. मात्र यंदा कोरोनामुळे व्यवसाय कमी झाला आहे. बकरी ईदसाठी पोसला जाणारा बोकड वजनदार असतो. जर आता तो विकला गेला नाही तर त्याला फुकट सांभाळत बसावे लागते. लॉकडाऊनमुळे व्यापारीही येत नाहीत यामुळे बकऱ्यांची मागणी खूप आहे मात्र विक्री होत नाही. शेतकऱ्याचे कोरोनामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com