गोदावरीच्या डाव्या कालव्यात महिला गेली वाहून, शोधकार्य सुरू

चंद्रकांत तारु 
Friday, 4 December 2020

नवगाव (ता.पैठण) येथील पतीसोबत गेलेली एक शेतकरी महिला शेतातील विद्युत मोटारीच्या पाईपमध्ये पाणी भरण्यासाठी शेताजवळील डाव्या कालव्यात गेली असता पायऱ्यांवरुन पाय घसरुन कालव्यात वाहुन गेली. ही घटना गुरुवारी (ता.तीन) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. रेखा अक्षय सोनवणे (वय २८, रा.नवगाव) असे या महिलेचे नाव आहे. 

पैठण (जि.औरंगाबाद) : नवगाव (ता.पैठण) येथील पतीसोबत गेलेली एक शेतकरी महिला शेतातील विद्युत मोटारीच्या पाईपमध्ये पाणी भरण्यासाठी शेताजवळील डाव्या कालव्यात गेली असता पायऱ्यांवरुन पाय घसरुन कालव्यात वाहुन गेली. ही घटना गुरुवारी (ता.तीन) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. रेखा अक्षय सोनवणे (वय २८, रा.नवगाव) असे या महिलेचे नाव आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पोलिस सुत्रांनी सांगितले की, सकाळी विहामांडवा येथे रुग्णालयात पती पत्नी गेले होते. रुग्णालयातून परत येत असताना त्यांच्या शेतातील विद्युत मोटारीत पाणी भरण्यासाठी थांबले. या दरम्यान महिलेने बादलीने पाणी आणले. शेवटीची एक बादली आणताना अचानक पाय घरसला व ती कालव्यातील वाहत्या पाणी पात्रात वाहुन गेली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार सुधीर ओव्हळ, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण बरडे हे घटनास्थळी दाखल झाले आहे. सदर महिलेचा शोध घेत आहे. घटनास्थळी नवगाव व शेजारीच असलेल्या तुळजापूर या गावातील ग्रामस्थांनी गर्दी केली असून शोधकार्य युद्धपातळीवर सुरु केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते दत्ता गोर्डे, माजी सभापती सुरेश दुबाले यांनी भेट देऊन शोध घेण्यासाठी मदत केली.  

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Godavari left canal woman was carried away