esakal | अवघ्या दोन तासांत मुंबई ते नागपूर प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

high speed railway.

या पहिल्या फेजसाठी 2016 मध्ये स्पेनच्या प्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या अभ्यास दौरा केला होता.

अवघ्या दोन तासांत मुंबई ते नागपूर प्रवास

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: देशात मेट्रो शहरांना जोडण्यासाठी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प (बुलेट ट्रेन) केंद्र सरकारने सुरू केला आहे. या कॉरिडॉरचा पहिला टप्पा 741 किलोमीटर लांबीचा मुंबई-नाशिक-औरंगाबाद-नागपूर असा असणार आहे. या मार्गामुळे औरंगाबादेतून मुंबई ते नागपूर केवळ दोन तासात गाठता येणार आहे.

या पहिल्या फेजसाठी 2016 मध्ये स्पेनच्या प्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या अभ्यास दौरा केला होता. या प्रकल्पाच्या अनेक कामांसाठीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील महत्त्वाच्या कामांचे वर्क ऑर्डर देण्यात आले आहे. आता इन्व्हार्मेन्टल इम्पेक्ट ॲसेसमेंट्स (ईआयए) पर्यावरण अभ्यास व गॅड ड्राईंगसाठीची निविदा प्रक्रीया राबविण्यात आली आहे. या कंपन्याना पुढील सहा महिन्यांत अहवाल तयार करणार असून, यातून पुढे येणारी माहिती डीपीआर मध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे देण्यात आली आहे. 

मराठवाड्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण; काही ठिकाणी रिमझिम पाऊस, पिकांना फटका 

देशात मुंबई- अहमदाबाद, दिल्ली- वारणासी, दिल्ली- अहमदाबाद, दिल्ली-अमृतसर, मुंबई-चेन्नई मार्गे वाराणसी या मार्गावरही हायस्पीडच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. यात मुंबई-कोलकत्ता या प्रकल्पाची पहिली फेज औरंगाबादसह मराठवाड्यासाठी महत्त्वाची आहे. या फेजमध्ये मुंबई, शहापूर, इगतपुरी, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव जहागीर, कारंजा लाड, पुलगाव वर्धा आणि नागपूर असे 12 स्टेशनला कनेक्टीव्हीटी करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गालगत हे हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प होणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरणाची मंजुरीसाठी आवश्‍यक असलेल्या बाबी काय असेल, यासाठी एसपीएस टेक्नॉलॉजी यांना काम देण्यात येणार आहे; तसेच अंतिम डिझाईनचा सर्व्हेचे काम सेकॉन प्रा. लिमेटड यांना देण्यात आले आहे. त्यांना 150 दिवसांत हा सर्वे पूर्ण करण्यासाठीची मुदत दिली आहे.

शहरांची नावं बदलून लोकांच्या आयुष्यात काय बदल झाले? - बाळासाहेब थोरात

यासह गॅड प्रिपरेशन, नदी लगतचे बांधकामे, बोगदा यांची पाहणी व अभ्यास करीत त्यांचा नकाशा तयार करण्याचे काम हे होल्टेक कन्सटिंग प्रा. लिमिटेडला देण्यात आले आहेत. हे काम तीन महिन्यांत ही कंपनी पूर्ण करणार आहेत. यासह ट्रॅफिक सर्व्हे स्टडी; काम दिल्ली येथील इन्ट्रीग्रेटेड मल्टी मेडर्स यांना देण्यात आले आहे.

यांचा अहवाल आल्यानंतर ते डीपीआरमध्ये (डिटेल्स प्रोजेक्ट रिर्पोट) त्यांचा समावेश केले जाणार आहे. याच्‍याच वेगवेगळ्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदा प्रक्रियांमुळे हायस्पीड रेल्वेच्या प्रकल्पास गती येणार आहे. राजधानी मुंबईतून उपराजधानी नागपुराला केवळ चार तासात जाता येणार आहे. 

औरंगाबादच्या बातम्या वाचा

मराठवाड्याला पहिल्या फेजचा फायदा- 
हायस्पीड रेल्वेचा हा कॉरिडॉर 2041 पर्यंत पूर्ण होणार आहे. औरंगाबाद हे ऑटोहब असल्यामुळे हायस्पीड रेल्वेचा शहरात येणाऱ्या उद्योजक आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. या हायस्पीड रेल्वेत 750 प्रवासी क्षमता असणार आहेत. या रेल्वेची स्पीड ही 250 किलोमीटर ते जास्तीत जास्त 320 पर्यत असणार आहे. औरंगाबाद, जालना या दोन शहराला मोठा फायदा होणार आहे.

(edited by- pramod sarawale)