औरंगाबाद : एकीकडे कैद्यांना सुट्टीचा आनंद तर दुसरीकडे घरी जाता येईना, अखेर त्यांनी हा घेतला निर्णय...!

harsul jail.jpg
harsul jail.jpg

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कारागृहात असलेल्या कैद्यांना संचित रजेवर सोडले जात आहे. याचाच लाभ घेत हर्सुल कारागृहातून सुटलेले तीन कैदी चालतच गावाकडे निघाले आहेत. त्यांना न्यायला ना नातेवाईक आले, ना प्रशासनाने सोडले. त्यामुळेच अनोख्या कसरती करत कैद्यांना गाव जवळ करावे लागत आहे. सिडको परिसरात बंदोबस्तावरील पोलिसांनी अडवल्याने शुक्रवारी (ता.१०) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
हर्सुल कारागृहातून संचित रजेवर अनेक कैदी घरी जात आहेत. मात्र, शहरात कालपासूनच कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. यादरम्यान, पोलिसांचाही तगडा बंदोबस्त आहे. जळगाव रस्त्यावरील सिडको एन-एक येथे हर्सुलकडून सिडको चौकाकडे येणारा पाण्याची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी अडवला. यावेळी ड्रायव्हर शेजारी तीन जण बसल्याने सगळ्यांनाच उतरवण्यात आले.
 धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

पोलिसांनी ड्राइव्हर सोडून इतर तिघांची चौकशी केली. यावेळी हर्सुल कारागृहातून संचित रजेवर नांदेड, परभणी, हिंगोली येथे घरी जात असल्याचे सांगितले. पोलिसांना कारागृह प्रशासनाने दिलेली कागदपत्रे दाखवली. मात्र, त्यानंतर पुन्हा ट्रॅक्टरवरुन प्रवास करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली. त्यामुळे कैद्यांनी जालनाच्या दिशेने चालत जाणेच पसंत केले. यावेळी कैद्यांनी मात्र, प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. 

ते जाणार कसे? हा प्रश्नच 
औरंगाबाद शहरात कडक लॉकडाऊन असल्याने सार्वजनिक तसेच खाजगी वाहतूक बंद आहे. यामुळे हर्सुलमधून सुटलेल्या कैद्यांना एकतर चालत जाणे किंवा अवैधरित्या प्रवास करणे हे दोनच मार्ग उरले आहेत. दरम्यान ठिकठिकाणी पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. 

नातेवाईकच त्यांना घ्यायला येतात. कैद्यांनी सांगितले असते तर, आम्हीच त्यांना सोडले असते. वाटेतही त्यांना अडचण आल्यास ते सांगु शकतात. पुढे सोडण्याची व्यवस्था करु. 
आशिष गोसावी, कारागृह अधिक्षक, हर्सुल, औरंगाबाद. 

संचित रजा मंजूर केल्याचे आठ दिवस आधीच कैद्यांना कळवले जाते. त्यादरम्यान पासची व्यवस्था करून नातेवाईकांना बोलावून घ्यावे असेही सांगण्यात येते. 
दिलीप झळके, कारागृह महानिरीक्षक, पुणे.

संपादन : प्रताप अवचार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com