
शाळांत पन्नास टक्के उपस्थितीबाबतच्या आदेशात स्पष्टता नाही
औरंगाबाद : राज्यातील शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये ऑनलाईन, ऑफलाईन, दूरस्थ शिक्षण व कामकाजासाठी ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ रुजू होण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पत्र काढणे आवश्यक असते. पंरतू, जि. प. शिक्षण विभागाने याबाबत अद्याप कोणतेही पत्र काढलेले नसताना अनेक मुख्याध्यापकांनी शिक्षकांना एक दिवसाआड शाळेत बोलवण्याचे फर्मान सोडले आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्या टप्प्याने सुरु करण्याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याच धर्तीवर प्रशासनाने शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप जिल्हा परीषद शिक्षण विभागाकडून याबाबत कोणत्याही सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत. तरीदेखील अनेक मुख्याध्यापकांनी शिक्षकांना दिवसाआड शाळेत येण्याच्या सूचना दिल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कोरोना अद्याप संपलेला नाही
जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी काहींचा मृत्यूदेखील झाला आहे. यासंदर्भात विमा भरपाईची प्रशासनाकडून अद्याप दखल घेतलेली नाही. तसेच जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक गुगलमीट व अन्य माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देत आहेत. मोठ्या शाळांमध्ये शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीमुळे कोरोनाचा प्रासार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
शिक्षकांचा शाळेत जाण्यास मुळीच विरोध नाही. परंतू, शासन आदेशानंतर शिक्षणाधिकारी यांनी याबाबत पत्र काढणे आवश्यक आहे. असे कोणतेही पत्र जि.प. शिक्षण विभागाने काढलेले नाही. केवळ महिला शिक्षिकांना त्रास देण्यासाठी काही मुख्याध्यापक हा प्रकार करीत आहेत.
राजू पवार, जिल्हा उपाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ
(संपादन-प्रताप अवचार)