राष्ट्रीय एकता, बंधूभावासाठी अठरा वर्षांपासूुन हेमराज यांची सायकलवर जगभर भ्रमंती !  

सुषेन जाधव
Thursday, 8 October 2020

मागील १८ वर्षापासून ते भ्रमंती करत असून आजवर त्यांनी २२ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. मानवतेची मुल्ये रुजावी यासाठी ते नागरिकांत जनजागृती करत आहेत. 

औरंगाबाद : मनुष्य प्राणी हा एक आहे, तिथे मानवता हाच धर्म आहे, जातीपाती मानू नका, राष्ट्रीय एकता टिकवून ठेवा, हा विश्‍वशांतीचा संदेश घेऊन हेमराज शिवाजी मडामे हे जगभर सायकल यात्रा करत आहेत. मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेले श्री. मडामे हे बुधवारी (ता.७) जालना करत औरंगाबादेत पोहोचले.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मागील १८ वर्षापासून ते भ्रमंती करत असून आजवर त्यांनी २२ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. मानवतेची मुल्ये रुजावी यासाठी ते नागरिकांत जनजागृती करत आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जाती धर्म सोडा, राष्ट्राला जोडा हे घोषवाक्य घेऊन त्यांनी प्रवासाला सुरूवात केली. आतापर्यंत कन्याकुमारी, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओडिशा असा प्रवास त्यांनी केला. पहाटे ५ वाजता प्रवासाला सुरूवात करतात. दुपारी १२ वाजेपर्यंत सायकल चालविल्यानंतर जिथे जागा मिळेल तिथे थोडावेळ विश्रांती घेतात. सायंकाळी साडेतीन ते चार वाजता पुन्हा यात्रा सुरू करून रात्री १० पर्यंत पुन्हा प्रवास करतात.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एक दोन दिवसात फुलंब्री, सिल्लोड, जळगाव त्यानंतर हायवे क्रमांक सहा आग्रा- मुंबई रस्त्याने प्रवास करत ठाण्यात काही दिवस मुक्काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जागोजागी लोकांचे आलेले अनुभव ते कथन करतात. ते म्हणतात की, बहूतांश ठिकाणी राजकारणी मंडळी माझ्या कामाची दखल घेतात, कौतूक करणारे पत्र देऊन शुभेच्छाह देतात, मात्र माझ्यासाठी कोणी करत काहीच नाही अशी खंत ते व्यक्त करतात. आजवर पडक्या शाळांत, दुकानाच्या आडोशाला आश्रय घेतला पण विश्‍वाशांतीचा वसा घेतलेला सोडला नाही, अन कदापि सोडणार नाही असं ते सांगतात. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hemraj journey for national unity