बाहेरगावी जाण्याआधी व्हा सावध ! औरंगाबादेत चार तोळे दागिनेच गेले ! 

सुषेन जाधव
Friday, 25 September 2020

कुटुंब गुजरातला गेले, तोवर घर फोडले, एन-एक परिसरातील घटना 

औरंगाबाद :  घरफोडीच्या घडणांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच सिडकोसारख्या उच्चभ्रू परिसरात चक्क बंगला फोडून तब्बल चार तोळे सोन्यासह २९ हजार रुपये रोख असा जवळपास सव्वादोन लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केला. ही घटना बुधवारी (ता.२३) समोर आली. सिडको एन-एक परिसरातील सेंट झेविअर शाळेजवळच्या बंद बंगला चोरट्यांनी फोडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात चोरांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

प्राप्त माहितीनुसार सिडको भागात प्रेमजी नॉर यांचा बंगला आहे. हे कुटुंब २२ सप्टेंबरला गुजरातेतील त्यांच्या गावी गेले होते. बंद चोरांनी मुख्य दरवाजाचे लोखंडी ग्रीलचे कुलूप आणि लाकडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाट उचकटून त्यातील एक तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, तीन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या आणि २९ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. नॉर यांचे भाऊ गणेश हिराजी नॉर हे बुधवारी (ता. २३) सकाळी बंगला सुरक्षित आहे का, हे पाहण्यासाठी आले होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी गणेश यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यावरून संशयित चोरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ही घटना कळताच गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, सहायक पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेज तपासणी सुरू केली असून, चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असतील अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Highbrow colony Theft Aurangabad news