मन हेलावून टाकणारा भीषण अपघात, बाप-लेक ठार, फुलंब्रीची घटना

नवनाथ इधाटे 
Saturday, 10 October 2020

आयशर व दुचाकी समोरासमोर धडकली - पत्नी, मुलगा गंभीर जखमी 

फुलंब्री (औरंगाबाद) : आयशर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन बाप-लेक ठार झाले तर पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात फुलंब्री-औरंगाबाद रस्त्यावरील आडनदीनजीक शुक्रवारी (ता.नऊ) दुपारी दीडच्या सुमारास घडला. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

गोकूळ अहेलाजी बखळे (वय ३०) व प्रांजल गोकुळ बखळे (चार, रा. हर्सूल, औरंगाबाद) असे अपघातात ठार झालेल्या पिता व मुलीचे नाव आहे. तर भाग्यश्री गोकुळ बखळे (२५), पवन गोकुळ बखळे (२) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आयशर (एमएच-०७, सी-५५५६) व बुलेट (एमएच-२०, डीजी-७७६७) यांच्यात फुलंब्रीजवळील आडनदीनजीक नव्याने सुरू झालेल्या पेट्रोल पंपासमोर जोराची धडक झाली. या धडकेत बुलेटवरील गोकुळ बखळे हे जागीच ठार झाले तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिकेद्वारे चालक विजय देवमाळी यांनी प्रथम फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान प्रांजलचा मृत्यू झाला. आई व मुलावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोकुळ बखळे यांचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अंकुश बागल हे करीत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horrific accident kills Baap-lek Fulambri news