HSC Result औरंगाबाद विभागाचा निकाल निच्चांकी...

संदीप लांडगे
Thursday, 16 July 2020

बारावी परीक्षेचा निकालाची अनेक विद्यार्थी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. त्यात सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा केल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता अखेर गुरुवारी परीक्षा मंडळाच्या वतीने निकाल जाहीर करण्यात आला.

औरंगाबाद ः  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. लाखो विद्यार्थ्यांचे डोळे ज्या निकालाकडे लागले होते तो बारावीचा निकाल आज अखेर दुपारी १ वाजता जाहीर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर आज संपली आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८ टक्के लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.१८ टक्के लागला आहे. 

 

बारावी परीक्षेचा निकालाची अनेक विद्यार्थी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. त्यात सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा केल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता अखेर गुरुवारी परीक्षा मंडळाच्या वतीने निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षा मंडळाच्या वतीने १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोना महामारी मुळे यावर्षी निकाल लावण्यासाठी विलंब झाला होता.

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के
विभागातील ४०६ परीक्षा केंद्रावर बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती. सदरील परीक्षेला विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यातून १ लाख ६४ हजार ७३० विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंद केली होती. त्यापैकी १ लाख ६३ हजार ७३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून १ लाख ४४ हजार ३७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
-

यंदाही मुलींचीच बाजी
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड असे एकूण विभागात बारावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. विभागातून 92.13 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर मुलांचे प्रमाण हे 85.66 टक्के लागला आहे. त्यामुळे यंदा मुलींचीच बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 5.77 टक्क्याने अधिक आहे. 

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....

गुणपडताळणीसाठी ऑनलाइनची सुविधा 
यंदा मंडळातर्फे निकालानंतरची प्रक्रियेसाठी ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शुक्रवारपासून (ता.17) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यास विषयांमध्ये त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे http://verification.mh-hsc.ac.in या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे शाळा व ज्युनियर कॉलेजमध्येही अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी 17 ते 27 जुलैपर्यंत छायाप्रतीसाठी 17 जुलैपासून 5 ऑगस्टपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत.

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 

विभागाची जिल्हानिहाय टक्केवारी ः
- औरंगाबाद ः 87.76 
- बीड  ः 88.83
- परभणी ः 84.66
- जालना ः 90.72
- हिंगोली ः 88.54

--

विभागाचा शाखानिहाय निकाल ः
- विज्ञान ः 95.19
- वाणिज्य ः 90.35
- कला ः 80.17
- एचएससी व्होकेशनल ः 80.13
--
एकूण निकाल ः 88.18

----


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HSC Result Aurangabad Division Has the Lowest Result