पतीचे बाहेर होते अनैतिक संबंध पत्नीला सुगावा लागला पण.....

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी मंगळवारी (ता.२६) रात्री बेड्या ठोकल्या. प्रवीण अशोक कडवे (३३, रा. देवळाई परिसर, बीड बायपास) असे आरोपी पतीचे नाव आहे. प्रकरणात मृत अमृता प्रवीण कडवे हिचे वडील तुकाराम जयवंत कांबळे (५७, रा. श्रीरामपूर) यांनी तक्रार दिली होती.

औरंगाबाद: विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी मंगळवारी (ता.२६) रात्री बेड्या ठोकल्या. प्रवीण अशोक कडवे (३३, रा. देवळाई परिसर, बीड बायपास) असे आरोपी पतीचे नाव आहे. प्रकरणात मृत अमृता प्रवीण कडवे हिचे वडील तुकाराम जयवंत कांबळे (५७, रा. श्रीरामपूर) यांनी तक्रार दिली होती.

क्लिक करा: सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे

तक्रारीनुसार, अमृता व आरोपी प्रवीण यांचे लग्न २००९ मध्ये झाले. त्यांना नऊ वर्षांची एक मुलगीही आहे. दरम्यान, लग्नाच्या चार वर्षांनंतर सासरच्या मंडळींकडून पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ होऊ लागला. दरम्यान, आरोपी पती प्रवीण याचे अनैतिक संबंध होते, तो वारंवार मोबाईलवर बोलायचा व चॅटिंग देखील करित होता.

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

याबाबत त्याला जाब विचारला असता तो पीडितेला शिवीगाळ करून मारहाण करीत होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून २४ मे रेाजी पीडितेने गळफास घेतला. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात पती प्रवीण कडवे याच्यासह, सासू मीराबाई कडवे, नणंद कल्याणी व दीर राहुल (सर्व रा. पिराचे बाभूळगाव ता. वैजापूर, ह.मु. नेवासा, नगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात सहायक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी काम पाहिले.

हेही वाचा- शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband Arrested In The Matter of Wife Suicide Aurangabad News