संतापजनक : चालक अन् दोन मुले गतिमंद मुलीशी बसमध्येच करायचे गैरप्रकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

एका विशेष मुलांच्या शाळेच्या स्कूल बसमध्ये घुसून दोन युवक एका आठवर्षीय मुलीला मारहाण आणि नको तिथे स्पर्श करीत होते. एवढेच नाही या प्रकाराचे चित्रीकरण करून ते व्हायरलही करीत होते. काही दिवसांपासून हा प्रकार बिनबोभाट सुरू होता.

औरंगाबाद - गतिमंद मुलांच्या स्कूल बसमध्ये घुसून एका अल्पवयीन गतिमंद मुलीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या तिघांविरुद्ध शनिवारी (ता. 18) सातारा पोलिसात
गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकारात स्कूलबसचा चालकच सहभागी असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या टोळक्‍याकडून मागील अनेक दिवसांपासून असे प्रकार सर्रास सुरू होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विशेष मुलांच्या शाळेच्या स्कूल बसमध्ये घुसून दोन युवक एका आठवर्षीय मुलीला मारहाण आणि नको तिथे स्पर्श करीत होते. एवढेच नाही या प्रकाराचे चित्रीकरण करून ते व्हायरलही करीत होते. काही दिवसांपासून हा प्रकार बिनबोभाट सुरू होता. विशेष म्हणजे यात स्कूलबसचा चालकही त्यांना मदत करीत होता. व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुख्याध्यापिकेने दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी स्कूलबसचा चालक अविनाश शेजूळ व अन्य दोन अल्पवयीन साथीदार अशा तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला. गुंडांचे हे टोळके शाळेतील अन्य मुलांनाही मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. 

जाणून घ्या - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा..

व्हिडिओ व्हायरल 
 

सदरील शाळेत गतिमंद, आत्ममग्न, बहुविकलांग व मेंदूचे पक्षपात झालेले असे चार प्रकारचे मुलांना शिकवले जाते. या मुला-मुलींना चालक, त्याचे साथीदार मारहाण करीत असल्याचा प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून शुक्रवारी (ता.17) समोर आला. त्यानंतर सदरील शाळेने आठ वर्षीय मुलीच्या आई-वडीलांना बोलावून घेतले. शनिवारी (ता. 18) व्हॅनचालक अविनाश व त्याचे वडील यांना शाळेत बोलावून चौकशी केली. त्यानंतर अन्य काही नावे समोर आली. 

  
विद्यार्थ्याने लिहिली चिठ्ठी 
 

शनिवारी सकाळी प्रार्थनेच्या वेळी एका विद्यार्थ्याने त्याच्या हस्ताक्षरात एक चिठ्ठी दिली. त्यामध्ये म्हटले, की बसवाला छोट्या मुलांना कापून, मारून टाकण्याची धमकी देतो. त्यांना चिमटे काढतो. यावरून चिमुरड्यासोबत काय प्रकार सुरु होता, याचा अंदाज येतो. ही चिठ्ठी शाळा प्रशासनाकडे आहे. 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Innocent Girls RashlyTeased By Stray Boys In SchoolBus