ग्राहकांना सुरळीत, अखंडित दर्जेदार वीजसेवा देणार : डॉ. एन. बी. गित्ते 

अनिलकुमार जमधडे
Thursday, 27 August 2020

महावितरणच्या प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद सहव्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. एन. बी. गित्ते रुजू. पदभार स्विकारल्यानंतर केली भावना व्यक्त. 

औरंगाबाद : महावितरण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद सहव्यवस्थापकीय संचालकपदी श्री डॉ. एन. बी. गित्ते आज ता.२७ रूजू झाले आहेत. तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक तथा जिल्हाधिकारी श्री सुनील चव्हाण यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी वीजग्राहकांना सुरळीत, अखंडित दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

मराठवाडयाचे भूमीपुत्र असलेले श्री. डॉ. एन. बी. गित्ते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक येथे उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करतांना विशेषत्वाने प्रधानमंत्री आवास योजना आणि ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम राबवितांना ग्रामीण स्वच्छता विशेष पुरस्कार मिळाले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मिरा भाईदंर महानगरपालिकेत महानगरपालिका आयुक्त म्हणून काम करतांना शहर स्वच्छता आणि शहर नियोजन स्पर्धेत महानगर पालिकेला देशात पहिल्या ५० मध्ये आणण्यात बहुमोल कामगिरी बजावलेली आहे. तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मुंबई येथे सहसचिव पदावर काम करतांना जल-धोरण मिशनच्या धोरण निश्चिती आणि स्वच्छता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत उल्लेखनिय कार्य केलेले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महानंद डेअरी, गोरेगाव, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक पदावर काम करतांना राज्य शासनाच्या लॉकडावून काळात शेतकर्यांकडून दुध संकलन करून त्या दुधावर प्रक्रियाद्वारे दुध बुकटी करणे. या महत्वपूर्ण योजनेची चोख अंमलबजावणी करण्यात त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. महावितरण कंपनीमध्ये वीज ग्राहकांना सुरळीत, अखंडित दर्जेदार सेवा देवून ग्राहक समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Edited By Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Joint Managing Director MSEDCL Regional Office Aurangabad Dr. N B Gitte appointed