
हवेत गोळीबार करीत एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. शहरातील देवानगरी भागात बुधवारी (ता.04) सकाळी अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
औरंगाबाद : हवेत गोळीबार करीत एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. शहरातील देवानगरी भागात बुधवारी (ता.04) सकाळी अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
पांढऱ्या रंगांच्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन चार अज्ञात हल्लेखोरांनी बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. नदीम पठाण राउफ पठाण असं अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव असल्याचे पोलिसांकडून कळले आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाच्या फोरव्हिलरमधून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी देवानगरी भागातील पीडव्ल्यूडी कॉलनीत हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बँकेत नोकरी करीत असलेले मदन अवधूत भोसले यांच्या घराचे काम ठेकेदार नदीम पठाण राऊफ पठाण यांनी घेतलेला आहे. ते सकाली साईडवर आले व कामगारांकडून बांधकामाची माहिती घेतली.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
त्याचवेळी अचानक एका पांढऱ्या रंगाच्या एका चारचाकी वाहनातून तीन ते चार व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी पठाण यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यांना धक्का देत यांना गाडीमध्ये ढकलत हवेत गोळीबार करून तेथून पसार झाले.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
हवेत फायरिंग झाल्याने कामगारांनी बाहेर येऊन पाहिले, त्यावेळी हल्लेखोरांनी तोपर्यंत पळ काढला होता. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाऴे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांच्यासह पथकांनी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी केली.
(संपादन-प्रताप अवचार)