esakal | ढील दे ढील दे दे रेऽऽ भैया
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कुटुंबासमवेत बहुरंगी पतंग उडविण्याची मजा काही औरच असते. "ढील दे ढील दे दे रेऽऽ भैया', म्हणत पतंगांची काटा-काटी करण्यात वेगळी अनुभूती शहरवासीयांनी घेतली. अशाच प्रकारे हजारो पतंगप्रेमींनी बुधवारी पतंगोत्सवात पतंगबाजीचा मनमुराद आनंद लुटला.

ढील दे ढील दे दे रेऽऽ भैया

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : मकरसंक्राती सणानिमित्त तिळगूळ वाटप करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात येतात. याच दिवशी तरुणाईने पतंगोत्सव साजरा केला. यंदाच्या पतंगोत्सवासाठी शहरात हजारो पतंगांची विक्री झाली. बुधवारी (ता.15) अनेक ठिकाणी कार्यक्रम रंगले होते. हजारो घरांच्या गच्चीवर तर काही मैदानावर तरुणांनी उत्सवाचा आनंद लुटला. 

"ढील दे ढील दे दे रेऽऽ भैया' असे म्हणत आपल्या प्रतिस्पर्धीचा पतंग कट करण्याची मज्जा या दिवशी प्रत्येक जण लुटत असतो. शहरात यंदा नायलॉन मांजाला बंदी असल्यामुळे इतर पर्यायी मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. सकाळी अनेक ठिकाणी पतंग उडविण्यात आले. दुपारनंतर पतंगाची संख्या कमी झाली. मांजामुळे पक्षांच्या जिवास धोके आणि अपघात होण्याची संख्या जास्त असल्याने अनेकांनी पतंग उडविण्याचे टाळले. यामुळे दरवर्षी आकाशात जिकडे-तिकडे दिसणारे पतंग यावेळी कमी प्रमाणात होते. 

हेही वाचा - रात्रीतून जिल्हा बॅंकेची शाखा गायब! 

सकाळच्या सत्रात जल्लोष 

कुटुंबासमवेत बहुरंगी पतंग उडविण्याची मजा काही औरच असते. "ढील दे ढील दे दे रेऽऽ भैया', म्हणत पतंगांची काटा-काटी करण्यात वेगळी अनुभूती शहरवासीयांनी घेतली. अशाच प्रकारे हजारो पतंगप्रेमींनी बुधवारी पतंगोत्सवात पतंगबाजीचा मनमुराद आनंद लुटला. सुमधुर संगीताच्या तालावर पतंग खेळण्याचा आनंद, यासह विविध पदार्थांची रेलचेल आणि पतंगोत्सवाचे आकर्षण होते. 

हेही वाचा - औरंगाबादेत अनुभवता येईल टायगर सफारी

आकाश पतंगमय
शहरीकरण व वेगवान जीवनमानामुळे बरेच पारंपरिक धार्मिक आणि सामाजिक सण साजरे करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाला आहे. पूर्वी सर्व नातलग आणि मित्रमंडळींबरोबर साजऱ्या होणाऱ्या सणांसाठी आता वेळ काढणे, एकत्र येणे अवघड झाले आहे. बुधवार याला अपवाद ठरला. सकाळी सर्व आकाश पतंगमय झाले होते. अनेकांनी सुमधुर संगीताच्या तालावर ठेका धरत नृत्याचाही आनंद लुटला. 

हेही वाचा - Video : या महापालिकेविरोधात पाच हजार नागरिक का उतरणार आहेत रस्त्यावर ? 

शिवसेनाच्या वतीने 3 हजार पतंग वाटप

मकर संक्रांत आणि पतंग हे समीकरण ठरलेले आहे. वयाने कितीही मोठी माणसे असली तरी मोठेपण विसरुन पतंग उडवताना लहान होतात याचा अनुभव पतंग महोत्सवात पहायला मिळतो. मकरसंक्रांतीनिमित्त शिवसेना मध्य विभागाचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून हडको येथील टी. व्ही. सेंटर मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत महोत्सवाला सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते लहान मुलांना पतंगांचे वाटप करण्यात आले. यावेळी 3 हजार पतंग वाटण्यात आले. 

हेही वाचा - आघाडीत असूनही कॉंग्रेस वंचितच, राज्यमंत्री सत्तार ठरले भारी!