
दुसऱ्या टप्प्यात लागणार १७ हजार दिवे
औरंगाबाद : महापालिकेने शहरातील ४० हजार जुने पथदिवे बदलून त्याठिकणी नवे वीज बचतीचे एलईडी पथदिवे लावले आहेत. याकामाचे १२० कोटी रुपयांचे कंत्राट आहे. कामे शंभर टक्के पूर्ण झाल्याने पथदिव्यांच्या वीज बिलात दर महिन्याला तीस लाखांची तर वर्षाकाठी तीन कोटी ३६ लाख रुपयांची बचत होत आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
एलईडी दिवे लावण्याच्या महागड्या निविदेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिले व ४० हजार दिवे बदलण्यात आले. शहरात जुन्या पद्धतीचे पथदिवे होते. त्यामुळे महापालिकेला सुमारे सव्वा कोटी रुपये महिन्याला पथदिव्यांचे बिल यायचे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आता तीस लाख रुपयांची बचत होत असल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले होते. वर्षाकाठी तीन कोटी ३६ लाख रुपयांची बचत पथदिव्यांच्या वीज बिलातून होणार आहे. त्यामुळे आता सातारा-देवळाईसह शहर परिसरात देखील एलइडी पथदिव्यांचा प्रयोग केला जाणार आहे. त्यासाठी सतरा हजार एलइडी दिवे लावले जाणार आहेत.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(Edited By Pratap Awachar)