बिबट्याने घरात घुसून शेळीचा पाडला फडशा, सोयगाव तालूक्यातील कवली पाड्यावर दहशत

यादव शिंदे
Friday, 13 November 2020

सोयगाव तालूक्यातील कवली परिसरात बिबट्याची दहशत. 

जरंडी (औरंगाबाद) : शेताच्या बंधाऱ्यावरून थेट घरात शिरण्याचा मार्ग काढून बिबट्याने एका घरातील शेळीला फस्त केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या बिबट्याच्या तासाभराच्या थराराने कवली गावातील आदिवासी वस्तीतील ग्रामस्थ रात्रभर जागीच होते. मात्र बिबट्याने शेळीच्या नरडीचा घोट घेवून घटनास्थळावरून पलायन केल्याचे प्रत्यक्ष ग्रामस्थांनी पहिले. या घटनेचा वनविभागाने शुक्रवारी पंचनामा केला आहे. या प्रकारामुळे कवली गावात दहशत पसरली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कवली ता.सोयगाव या गावात दोन दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे ग्रामस्थ कामारोद्दिन तडवी,सरदार तडवी यांनी सांगितले या आधीही बुधवारी दुपारी अशोक भिसे यांचा एक बोकुड बिबट्याने पळविला होता या बोकुडचे हाडांचा सापळा गुरुवारी आढळला त्यानंतर गृव्राई मध्यरात्री पुन्हा बिबट्याने या वस्तीकडे एका शेतातून रात्री गोविंदा भिसे यांच्या घरात शिरून कुटुंब झोपले असतांनाची संधी साधून पुन्हा दुसऱ्या बोकुड वर हल्ला चढवून फस्त केले आहे.दरम्यान शुभम भिसे या १४ वर्षीय बालकाला जाग येताच त्याने घरातील सदस्यांना उठविले असता,हालचाली पाहून बिबट्याने पळ काढला.या दोन्ही घटनेत पशुपालक यांचे मोठे नुकसान झाले आहे.बिबट्या आल्याचे कळताच शेजारील ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेवून बिबट्याला हुसकावून लावल्याचे सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तो बिबट्या नव्हेच वनविभागाचा दुजोरा 
कवली गावातील गोविंदा भिसे यांच्या घरातून बोकूड वर हल्ला चढविणारा तो वन्यप्राणी बिबट्या नसल्याचा दुजोरा वनविभागाने दिला असून झालेला हल्ला हा हिंसक वन्य प्राण्यांचाच असल्याचे वनविभागाने सांगितले असून सदरील शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका वनविभागाने घेतली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कवली गावात रात्रभर दहशत
या घटनेमुळे कवली (ता.सोयगाव) गावात मोठी दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे रात्रभर ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. मात्र वनविभाग तो वन्यप्राणी बिबट्या नसल्याचे सांगत असतांना प्रत्यक्षमात्र ग्रामस्थांनी रात्री बिबट्याला पाहिल्याचे सांगितले यावरून मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard kills goat Kavali village news