लॉकडाऊनमुळे पिलं अन तीन हजार अंड्यांचा प्रश्‍न 

file photo
file photo

औरंगाबाद - कोरोनामुळे शहरात संचारबंदी तर बाहेरगावाहून ये जा करण्यासाठी लॉकडाऊनमुळे वाहतुक बंद आहे. यामुळे पडेगाव येथील अंडी उबवणुक केंद्रात तयार होणाऱ्या एक दिवसांच्या पिलांच्या आणि सुमारे तीन हजार अंड्याच्या विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोंबडीच्या पिलांना दानापाणी करत त्यांचा सांभाळ करत बसण्याची वेळ या केंद्रावर आली आहे. 

कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतर काहींनी चिकनमधुन कोरोनाचा प्रसार होतो अशी अफवा केली होती, यामुळे पोल्ट्री व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. मात्र यामध्ये तथ्य नसुन मटन, चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोना होत नाही. मटन, चिकन, अंडी, मासे चांगले शिजऊन खाल्ल्यानंतर कोरोनाच काय, काहीही होत नाही असे तज्ञ डॉक्टरांनी, पशुवैद्यकांनी स्पष्ट केले आहे. यानंतर मटन, चिकन, अंडी, मासे यांना मागणी वाढली आहे, मात्र त्यांची आता उपलब्धता कमी असे चित्र निर्माण झाले आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तीन हजार अंडयांचा प्रश्‍न 

पडेगाव येथील अंडी उबवणुक केंद्रातुन शासकीय योजनातील लाभार्थ्यांना तसेच खासगी पोल्ट्री व्यावसायीकांना शासकीय दरात एक दिवसाची पिले विकली जातात. तर अंडीही विकली जातात. दर सोमवारी आणि गुरुवारी अंडी विक्रीसाठी ठेवली जातात. परंतु सध्या संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे अंडी विकत घेण्यासाठी येणाऱ्यांना अडचण येत असल्याने अंडी नेण्यासाठी कोणी येत नाहीत. 
येथील सहाय्यक संचालक डॉ. खलील पटेल यांनी सांगीतले सध्या या केंद्रात आठ हजार अंडी शिल्लक होते, यापैकी सोमवारी (ता.सहा ) पाच हजार अंड्यांना ग्राहक मिळाले असून आणखी तीन हजार अंड्यांचा प्रश्‍न आहे. एका वेळी १० हजार अंड्यांची साठवणुक करता येईल एवढी येथील वातानुकुलीत कक्षाची क्षमता आहे. शिल्लक अंडी विकण्यासाठी नेहमी अंडी घेणाऱ्यां विक्रेत्यांशी आम्ही संपर्क करुन ही अंडी मार्गी लावण्याच्या प्रयत्नात आहोत. 

 मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आठवडाभरात होतील १८ हजार पिले 

डॉ. पटेल यांनी सांगीतले सध्या इन्क्युबीटरमध्ये १८ हजार अंडी ठेवण्यात आली आहेत. या अंड्यातुन आठवडाभरात पिले निघतील. लॉकडाऊनपुर्वी जालना जिल्हा परिषदेची जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रमांतर्गत २०१९ - २० साठी ३७ हजार पिलांची आॅर्डर होती, त्यापैकी २४ मार्च नंतर ११ हजार पिले पाठवली आहेत. उर्वरीत पिले आठवडाभरात निघणाऱ्या लॉटमधुन पाठवण्यात येतील, पिलांच्या सुरक्षिततेची आम्ही काळजी घेऊ मात्र या पिलांच्या वाहतुकीला परवानगी मिळाली तरच ही एक दिवसांची पिले पाठवता येतील अन्यथा त्यांना इथेच ठेवण्याची वेळ येइल.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com