प्रवाशांनी फिरविली प्रवासाकडे पाठ

अनिल जमधडे
बुधवार, 18 मार्च 2020

 धसका कोरोनाचा : एसटी, रेल्वे आणि विमान सेवेवर विपरित परिणाम 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी एसटी, रेल्वे आणि विमान प्रवासाकडे पाठ फिरविल्याने प्रवाशी सेवेवर विपरित परिणाम झाला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी शासनाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, ही मात्र समाधानाची बाब आहे. 

एसटी महामंडळाच्या बस गाड्या, काही रेल्वे रद्द आणि विमानसेवा रद्द कराव्या लागत आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने बुधवारी (ता. १८) मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवासी संख्या रोडावली होती. त्यामुळे बस गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. 

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर नाशिक-पुणे मार्गावरील शिवनेरी- शिवशाही बंद

पाच तास प्रवाशांची प्रतिशक्षा

पुणे जाण्यासाठी सकाळी साडेपाच वाजता शिवनेरी बस प्लॅटफॉर्मवर लावण्यात आली. मात्र तब्बल पाच तास बस उभी केल्यानंतर कसेतरी अठरा प्रवाशी गोळा झाले. अवघे १८ प्रवाशी घेऊन ही बस पुण्याला रवाना झाली. त्यानंतर सव्वा सहा वाजता पुणे प्लँटफार्मवर शिवशाही बस लावण्यात आली होती. मात्र अकरा वाजेपर्यंत बस उभी केल्यानंतर कसेबसे २९ प्रवाशी आले, त्यानंतर २९ प्रवाशांना घेऊन ही बस पुणे मार्गाने निघाली. पुणे मार्गावर दररोज शिवशाहीच्या १८ फेऱ्या चालवल्या जातात. त्यापैकी प्रत्येकी केवळ एक एक फेरी पुणे मार्गासाठी चालवण्यात आली. नाशिक मार्गावरील सहा फेऱ्या रद्द कराव्या लागल्याची माहिती आगार प्रमुख पीएम शिंदे यांनी दिली. 

औरंगाबादेत फिल्मीस्टाईलने खून, मारेकऱ्याच्या हातात साप

 रेल्वे गाड्या ओस 

एसटीप्रमाणेच रेल्वेगाड्यांचीही अवस्था झाली आहे. ज्या रेल्वेगाड्या धावत आहेत, त्यामध्ये प्रवासी अत्यंत कमी असल्याचे दिसत आहे. अनावश्यक प्रवास टाळा असे शासनातर्फे वारंवार सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एकत्र येणे टाळले पाहिजे असा असा प्रचार करण्यात येत असल्याने या प्रचाराला प्रवाशांनीही चांगली साथ दिली आहे. एसटी आणि रेल्वेचे नुकसान होत असले तरीही करण्याचा संसर्ग टाळण्यासाठी मात्र हे महत्त्वाचं पाऊल असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. 

तोंडाला मास्क बांधुन महावितरणची वसुली

विमानसेवेवरही परिणाम 

कोरोनाच्या धास्तीने विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. प्रवाशी संख्या कमी झाल्याने स्पाईस जेटची तीन विमाने मंगळवारी (ता. १७) कंपनीला रद्द करावी लागली. हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद, अहमदाबाद-औरंगाबाद-अहमदाबाद आणि दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली ही विमानसेवा कंपनीने रद्द केली. ही तीन्ही विमाने ऑपरेशनल कारणामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra State Road Transport Corporation News