मराठा समाज आमचे मोठे बंधु, आमचे वाटेकरू होऊ नका : समता परिषदेचा इशारा

प्रकाश बनकर
Wednesday, 16 December 2020

प्रत्येक वेळी आम्ही मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहिलो आहोत. हा समाज आमचा थोराला भाऊ आहे. मात्र मराठा समाजाने आमच्या हिशात दावेदार होऊ नयेत. तसा प्रयत्न केल्यास ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी बुधवारी (ता.१६) औरंगाबादेत पत्रकार परिषदेत दिला.

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावेत अशी आमचीही भूमिका आहे. प्रत्येक वेळी आम्ही मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहिलो आहोत. हा समाज आमचा थोराला भाऊ आहे. मात्र मराठा समाजाने आमच्या हिशात दावेदार होऊ नयेत. तसा प्रयत्न केल्यास ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी बुधवारी (ता.१६) औरंगाबादेत पत्रकार परिषदेत दिला.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे शुक्रवारी (ता.१८) औरंगपूरा ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत ‘ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

 

 

या मोर्चाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. श्री.भुजबळ म्हणाले, ३८५ जाती असलेला ओबीसी समाज आहे. हा समाज २७ टक्के आरक्षणावर जगत आहे. यासह याच समाजाच पूर्णपणे आरक्षण लागू झालेले नाहीत. यामुळे काही नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण लागू झालेल्या नाही. यातच मराठा समाजा ओबीसीतून वाटा मागत आहेत. मराठा समाजातही दुर्बल घटक आहेत. त्यांनाही आरक्षण मिळावेत मात्र आमच्यातील वाट्यातून नको, अशी आमची मागणीही आहेत. यासाठीच राज्यभरात पन्नासहून अधिक मोर्चे निघाले आहेत.

 

 

प्रत्येक जिल्हा, तालुक्यात आंदोलन मोर्चे निघत आहेत. यासह २०१४ मध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात आली. मात्र तत्कालीन सरकारने ती जाहीर केली नाही. ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी ही आग्रही भूमिका आहे. शुक्रवारी (ता.१८) सकाळी दहा वाजता महात्मा जोतीराव फुले चौक, औरंगपुरा येथून औरंगाबादचा मोर्चा काढण्यात येणार आहेत. माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढणार आहोत, असेही श्री.भुजबळ यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, माजी जिल्हाध्यक्ष जयराम सोळूंके, गजानन सोनवणे, संतोष विरकर, निशांन पवार, गणेश काळे, संदीप घोडके, चंद्रकांत पेहरकर, प्रसन्ना राऊत, नागेश हिवाळे, वामन भागवत, विराज घोडके आदी उपस्थित होते.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Community Is Big Brother, Samata Parishad Said Aurangabad