Corona स्थलांतरीत कामगारांना हवा ईएसआयसीचा लाभ 

file photo
file photo

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे लाखोच्या संख्येने कामगारांनी गेल्या तीन साडेतीन महिन्यात स्थलांतर करून ते आपापल्या गावी, राज्यांमध्ये गेले आहेत. या कामगारांकडे सद्या उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 
सध्या कंपन्यांमध्ये कामावर असलेल्या कामगारांचे पगार कमी करण्यात आले आहेत. यामुळे त्यांना इएसआयसी व इपीएफ योजनांचे लाभ देण्यात यावेत अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार मदत केंद्रातर्फे देण्यात आला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कामगार मदत केंद्राच्या माध्यमातून कामगार मदत केंद्राचे अध्यक्ष तथा युवा सेनेचे शहर सचिव अक्षय खेडकर कामगारांचे प्रश्‍न लावुन धरत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, परराज्यातील कामगारांना स्वतःच्या जिल्ह्यांमध्ये इएसआयसी व इपीएफ योजनांचे पैसे काढण्यासाठी परवानगी मिळावी . 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभुमीवर विद्यमान गंभीर परिस्थितीत कामगारांना केंद्र सरकार त्यांच्या हक्काचे पैसे व कामगारांनासाठी ज्या योजना केंद्र सरकारने काढल्यात आहेत. त्या योजनेचा लाभ कामगारांना त्वरित मिळावा अशी मागणी केली आहे. तसेच
महाराष्ट्रातून परराज्यात गेलेल्या स्थलांतरित कामगारांची संख्या लाखोच्या घरात आहे. त्यामुळे स्थलांतरीत झालेल्या कामगारांना त्यांच्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या लाॅकडाऊनच्या काळामध्ये त्यांना किमान एक वर्षाचा ईपीएफ किंवा ईएसआयसी माफ करावा आणि त्यांना या योजनेअंतर्गत ज्या सुविधा दिल्या जातात त्याचा या कामगारांना पुढील वर्षीही लाभ द्यावा. यामुळे कामगार थोडे स्थिराऊ शकतील, त्यांच्या घरात या माध्यमातुन महिनाभराचे रेशन मिळेल.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

केंद्र सरकारच्या वतीने या कामगारांना भत्ता द्यावा तसेच कामगारांच्या योजनेचासुद्धा लाभ देण्यात यावा अशी केंद्रीय श्रम व रोजगार राज्य मंत्री संतोष कुमार गंगावर व राज्य सरकारचे मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे ई मेलद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावर अक्षय खेडकर , राजीव साबळे , रवी फुले , आशिष गायकवाड , अक्षय पाथरीकर, अमीर शेख, बंडू शिंदे, पवन वाकुरे ,अविनाश खेडकर, अजय चव्हाण , विनोद राठोड यांची नावे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com