एमआयएमचे मंदिर प्रेम एक स्टंटबाजी : आ. अंबादास दानवे यांनी साधला निशाना

प्रकाश बनकर
Tuesday, 1 September 2020

हिंदूंना शिव्या देत मंदिरांवरील भगवा उतरण्याची भाषा करणाऱ्या एमआयएमला आताच कुठून हिंदू मंदिराविषयी प्रेम निर्माण झाले. एमआयएमचे हिंदू प्रेम हे बेगडी आहे, ही एक स्टंटबाजी आहे. असा निशाना आ. अंबादास दानवे यांनी साधला आहे. 

औरंगाबाद : हिंदूंना शिव्या देत मंदिरांवरील भगवा उतरण्याची भाषा करणाऱ्या एमआयएमला आताच कुठून हिंदू मंदिराविषयी प्रेम निर्माण झाले. एमआयएमचे हिंदू प्रेम हे बेगडी आहे, ही एक स्टंटबाजी आहे.  हिंदूंच्या मंदिरांची जबाबदारी हिंदू बघतील, त्यांनी मस्जिदचे बघावे अशी टिका शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी खा. इम्तियाज जलील यांच्या मंदिराविषयीच्या भूमिकेवर केली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

संस्थान गणपतीच्या गणेश विसर्जन कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एमआयएमवर निशाना साधला. एमआयएमचे खा. इम्तियाज जलील हे आज दुपारी दोन वाजता शहराचे ग्रामदैवत खडकेश्वर मंदिराच्या पुजार्यांना मंदिर खुले करावे असे निवेदन देणार आहेत. यावर आमदार अंबादास दानवे यांनी टिका केली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पुढे बोलताना आमदार दानवे म्हणाले की, एमआयएमने मस्जिद बघावी त्यांच्या मौलवींना निवेदन द्यावेत, आम्हाला त्यांची काही चिंता करण्याची गरज नाही. खडकेश्वर हे मंदिर हे शहराचे ग्रामदैवत आहेत. सरकार परवानगी देईल तेव्हा, विधिवत पूजा करून मंदिर उघडले जाईल. काल प्रकाश आंबेडकर यांनी हे आंदोलन केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले आहेत. लवकरात लवकर या विषयी नियमावली ठरल्यानंतर मंदिर, मश्जिद, गुरुद्वारा उघडले जाईल, असेही आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM temple love is stunt mla Ambadas Danve