esakal | मिटमिटा मॉन्टीसिंग हत्याकांड : मित्रानेच केला मित्राचा 'गेम'
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_547.jpg

संशयित राजकीय पक्षाचा पदाधिकारी 

मिटमिटा मॉन्टीसिंग हत्याकांड : मित्रानेच केला मित्राचा 'गेम'

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : मिटमिटा येथील हत्या झालेल्या माँटी सिंग हत्याकांडातील संशयित आरोपीला पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथून ताब्यात घेतले. मित्रानेच माँटी सिंगची चाकूने भोसकून हत्या केल्याचे आता समोर आले आहे. कपिल रापते ऊर्फ राजे (वय ३३ वर्षे, ह.मु. बीड बायपास) असे संशयित आरोपीचे नाव असून तो राष्ट्रीय जनता दलाचा प्रदेश उपाध्यक्ष असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
मिटमिटा भागातील पीस होम सोसायटीतील मंटूश कुमार सिंग ऊर्फ माँटी सिंग याची हत्या झाली. तब्बल सहा दिवसांनंतर छावणी आणि गुन्हे शाखा पोलिसांनी या हत्याकांडातील संशयित आरोपी रापतेच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी एका तरुणीलादेखील छावणी पोलिसांनी हत्येच्या दुसऱ्याच दिवशी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच माँटी सिंगच्या मोबाईलमधील संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले होते. तेव्हापासून पोलिस रापतेच्या मागावर होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संशयित आरोपी कपिल रापते ऊर्फ राजे याला परभणीतून तडीपार करण्यात आले होते. तेव्हापासून तो औरंगाबादेत राहत होता. माँटीच्या प्रेयसीकडे रापते थांबत होता. त्यामुळे माँटी आणि रापते यांच्यात वाद झाला़ होता. लॉकडाउनच्या काळात माँटीसह त्याच्या मित्रांनी पडेगाव येथील बंद असलेल्या एका ढाब्यात नेऊन कपिल रापते याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर प्रेयसीसह माँटी हा तीन महिने मिटमिटा भागातील पीस होम सोसायटीतील एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होता़. माँटी हत्याकांडापूर्वी माँटीने त्याच्या प्रेयसीला मारहाण केली होती़. तिने ही कैफियत कपिल रापतेकडे केली होती. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आई-वडिलांना कॉल केला अन् अडकला 

माँटी सिंगच्या हत्येनंतर कपिल रापतेने त्याचा मोबाईल बंद करून ठेवला होता़. त्याने परभणीत आई-वडिलांना कॉल केला आणि आपण पुण्यात एका नातेवाइकांकडे थांबल्याचा निरोप दिला. मंगळवारी त्याचे आईवडील हे परभणी येथून पुण्यात पोचले तेव्हा पुण्यातच तळ ठोकून असलेले पोलिसदेखील त्यांच्या मागे दौंड येथे पोचले. छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन वायाळ, अशोक नागरगोजे, रोहित चिंधाळे, टी.के.शिंदे, एम.डी.पायघन आदींच्या पथकाने दौंड येथील कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतून एका मित्राच्या घरातून दुपारी ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

(Edited By Pratap Awachar)